शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात ५० हजार ६४४ जणांनी घेतला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील ५ हजार ५६३ योद्ध्यांची लसीकरणासाठी ...

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील ५ हजार ५६३ योद्ध्यांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली होती. त्यात पाच हजार ७९३ आरोग्य सेवकांना पहिला डोस, तर तीन हजार ७६३ जणांना दुसरा डोस देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलीस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवांतील तीन हजार ५५३ कोरोना योद्ध्यांचे नामांकन करण्यात आले. यात तीन हजार ८२९ जणांना पहिला डोस व १९८० जणांना दुसरा डोस देण्यात आला. आरोग्यसेवक व फ्रंटलाईन वर्कर मिळून ९ हजार ११६ नोंदणीकृत लाभार्थ्यांना पहिला व दुसरा असे १५ हजार ३६५ डोस देण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्याधिग्रस्त नागरिक व ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचे धोरण शासनातर्फे अवलंबण्यात आले. आतापर्यंत २१ हजार ९५६ ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस; तर तीन हजार ६५० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. तसेच नऊ हजार ८८ व्याधिग्रस्त नागरिकांना पहिला डोस, तर ५८५ जणांना दुसरा डोस देण्यात आला.

चंद्रपूर महापालिकेमार्फत एप्रिलप्रारंभी लसीकरणाचा आकडा ३८ हजार ५९३ इतका होता. यात कोविशिल्ड ३५ हजार १२० तर, कोव्हॅक्सिन लस तीन हजार ४७३ जणांना देण्यात आली. या केंद्राच्या माध्यमातून एकूण ५० हजार ६४४ जणांनी लसीची पहिली आणि दुसरी मात्रा घेतली. यात ४३ हजार ७०२ कोविशिल्ड, तर ६ हजार ९४२ जणांनी कोव्हॅक्सिन घेतली. दरम्यान, शुक्रवारी लसीकरण झाले नाही. लसीचा साठा उपलब्ध होताच लसीकरण सुरू होईल, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

लस उपलब्ध नसल्याने १५ केंद्रे बंद

मागील १५ दिवसांत लसीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. यात रामचंद्र हिंदी प्राथमिक स्कूल, शहरी नागरी आरोग्य केंद्र २, गजानन मंदिर (वडगाव) , शकुंतला लॉन (नागपूर रोड) , पोद्दार स्कूल (अष्टभुजा वॉर्ड) , रवींद्रनाथ टागोर स्कूल (विठ्ठल मंदिर वाॅर्ड), बजाज पाॅलिटेक्निक काॅलेज (बालाजी वाॅर्ड), डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा, एनयूएलएम (हॉस्पिटल वॉर्ड), शहरी नागरी आरोग्य केंद्र ५ (नेताजी चौक बाबूपेठ), राजाभाऊ खोब्रागडे सभागृह (बाबूपेठ), मुरलीधर बागला शाळा (बाबूपेठ) , मातोश्री स्कूल (तुकूम), विद्याविहार स्कुल (तुकूम), कन्नमवार प्राथमिक शाळा (सरकारनगर), शहरी नागरी आरोग्य केंद्र १, इंदिरानगर, डीइआयसी बिल्डिंग, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, आदी शासकीय लसीकरण केंद्रासह संजीवनी हॉस्पिटल, काईस्ट हॉस्पिटल, वासाडे हॉस्पिटल, मुसळे हॉस्पिटल, मानवटकर हॉस्पिटल या केंद्राचा समावेश आहे. पण, लस नसल्याने ही केंद्रे बंद आहेत.

लसीकरण स्थिती

पहिली मात्रा

ज्येष्ठ नागरिक : २१९५६

सहव्याधी ९०८८

आरोग्य कर्मचारी ५७९३

फ्रंटलाईन वर्कर ३८२९

दुसरी मात्रा

ज्येष्ठ नागरिक ३६५०

व्याधिग्रस्त ५८४

आरोग्य कर्मचारी ३७६३

फ्रंटलाईन वर्कर १९८०

एकूण लसीकरण ५० ६५५

कोव्हीशिल्ड - ४३ हजार ७०२

कोव्हॅक्सिन - ६ हजार ९४२

४३ हजार ७०२ कोव्हीशिल्ड, तर ६ हजार ९४२ जणांनी घेतली कोव्हॅक्सिन