शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर @ ४६.४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:26 IST

चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्हाच सध्या सूर्याच्या प्रकोपामुळे होरपळून निघत आहे. सूर्याने चंद्रपुरात रविवारी जणू उग्ररुपच धारण केले की काय, असे वाटत होते. तापनामाने आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे.

ठळक मुद्देतापमानाने गाठला उच्चांकआतापर्यंतचे सर्वाधिक तापमान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्हाच सध्या सूर्याच्या प्रकोपामुळे होरपळून निघत आहे. सूर्याने चंद्रपुरात रविवारी जणू उग्ररुपच धारण केले की काय, असे वाटत होते. तापनामाने आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. रविवारी चंद्रपुरातील तापमान ४६.४ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आले. तप्त उन्हामुळे चंद्रपुरातील रस्ते आज दिवसभर ओस पडल्याचे दिसून आले.मागील पंधरवाड्यातच चंद्रपुरात सुर्याचा पारा ४५ अंशापर्यंत गेला होता. यापूर्वीच ४५.३, ४५.४, ४५.९ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या वाढत्या तापमानाचा नागरिकांनी धसका घेतला असून याचा जनजीवनावरही परिणाम पडत आहे. याशिवाय पाण्याचे स्रोत आटल्याने ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न तिव्रतेने उभा ठाकला आहे. ‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरचा उन्हाळा राज्यात प्रसिध्द आहे. सर्वाहून अधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातच होत असते. यंदाही चंद्रपूर जिल्ह्याची ही ओळख कायमच राहणार, असे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच जिल्ह्यात उन्हाचे चटके बसू लागतात, असा अनुभव दरवर्षीच नागरिकांना येतो. मात्र यावेळी फेब्रुवारी महिना साधारण गेला. आणि मार्च महिन्यातही फारसे तापमान नव्हते. होळी झाल्यानंतर तापमानात किंचित वाढ झाली. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे तापमान घटले होते. सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण राहत असल्याने वातावरणात काही दिवस गारवा होता. मात्र अवकाळी पावसाचा गारवा फार काळ टिकला नाही. एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यापासून ऊन्ह तापू लागले. मागील पंधरवाड्यापासून तापमानाने उच्चांक गाठला आहे. सातत्याने पारा ४५ अंशापार जात आहे. एप्रिल महिन्यात सुर्याने चंद्रपूरकरांची चांगलीच लाहीलाही केली. सूर्याचा हा प्रकोप असह्य होत आहे. सुर्याने अक्षरश: आग ओकणे सुरू केले आहे. या वाढत्या उष्णतामानामुळे जवजीवनावरच परिणाम झाला आहे. सकाळी ९ वाजतापासून उन्हाचे चटके असह्य होऊ लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.रविवारी तर तापमानाने मर्यादाच ओलांडल्याचे दिसून आले. ४६.४ अंश सेल्सीयस तापमानाची चंद्रपुरात नोंद करण्यात आली. तर ब्रह्मपुरीत ४६ अंश सेल्सीयस तापमान नोंदविण्यात आले. एरवी गजबजलेले चंद्रपुरातील मुख्य रस्ते रविवारी दुपारी ओस पडल्याचे दिसून आले. सध्या काही शाळा-महाविद्यलयांनाही सुट्या लागल्या असल्याने दुपारी शहरात निरव शांतता पसरल्याचे दिसून येत आहे. नागरिक सायंकाळीच बाहेर निघणे पसंत करीत आहेत. एकूणच नागरिकांनी उन्हाचा चांगलाच धसका घेतला आहे.मागील तीन दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. पारा सातत्याने वाढत आहे. येणाऱ्या काही दिवसात तापमान आणखी वाढणार असल्याचे संकेत आहेत. या वाढत्या तापमानामुळे सरपटणारे प्राणी, पक्ष्यांनाही धोका निर्माण झाला आहे. ४७ ते ४९ अंश सेल्सीयस तापमानात पक्ष्यांना पाणी मिळाले नाही तर त्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो.वीज केंद्र, सिमेंट रस्त्यांमुळे तापमानात वाढचंद्रपुरातील किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. चंद्रपूरला लागूनच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आहे. या ठिकाणी सातत्याने कोळसा जाळला जातो. त्यामुळे चंद्रपूरचे किमान तापमान वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय शहरात सिमेंटचे रस्तेही याला कारणीभूत आहेत. चंद्रपूर शहराबाहेर किमान तापमान कमी असते. त्यामुळे रात्री शहराबाहेर गारवा अनुभवास येतो. रविवारी चंद्रपूरचे किमान तापमान ३१.२ तर ब्रह्मपुरीचे २७.७ अंश सेल्सीयस होते.मे महिन्याची अनेकांना धास्तीएप्रिल महिन्यातच सुर्याने आग ओकणे सुरू केले आहे. तप्त सुर्यकिरणे असह्य होत आहेत. चंद्रपूरकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. एप्रिल महिन्यातच हे हाल आहेत तर पुढे मे महिन्यात कसे होईल, याचा धसका चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आतापासून घेतला आहे. मे महिन्यात येणाऱ्या उष्णतेच्या लाटेचा सामना कसा करावा, या चिंतेत चंद्रपूरकरांची झोप उडाली आहे.किमान तापमानही फोडतोय घामचंद्रपूरचे तापमान राज्यात सर्वाधिक असते, याचा अनुभव चंद्रपूरकरांनी अनेकवेळा घेतला आहे. हे कमाल तापमानाबाबत असते. मात्र मागील काही दिवसांपासून चंद्रपूरचे किमान तापमानही सातत्याने वाढत आहे. ३०, ३०.२, ३२ अंश सेल्सीयस अशी किमान तापमानाची नोंद होत आहे. रविवारीही ३१.२ अंश सेल्सीयस किमान तापमान नोंदविण्यात आले. या तापमानामुळे चंद्रपुरात रात्री १२ वाजेपर्यंतही वातावरणात गरम हवा राहत आहे. रात्री उशिरापर्यंत वातावरण थंड होत नाही. त्यामुळे या किमान तापमानाचाही चंद्रपूरकरांनी धसका घेतला आहे.