आतापर्यंत ३२ हजार क्विंटल खरेदी : वरोऱ्यात नाफेडची खरेदी प्रारंभलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात यावर्षी तूर खरेदीचे तीनतेरा वाजले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तूर खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले. परंतु त्याचा परिणाम चंद्रपूरच्या खरेदी केंद्रावर झालेला नाही. विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरनेशनने चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अद्याप तूर खरेदी सुरू केलेली नाही. त्यामुळे बाजार समितीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तूर खरेदी सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याच वेळी वरोरा येथे नाफेडने पुन्हा मंगळवारपासून तूर खरेदी सुरू केली आहे.जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत २५ हजार ५०० क्विंटल तूर खेरदी करण्यात आली होती. त्यानंतर गोंधळ उडाल्यावर २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रावर आलेली तूर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा पुन्हा ६ हजार ५०० किंटल तूर खरेदी करण्यात आली. एकूण ३२ हजार २४४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यामध्ये चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खुल्या खरेदीमध्ये सर्वाधिक ११ हजार ९३७ क्विंटल तूर खरेदी केली. चंद्रपूर बाजार समितीमध्ये भारतीय धान्य महामंडळासाठी विदर्भ को-आॅपरेटिव्ह फेडरेशनने १० हजार १०७ क्विंटल आणि वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडने १० हजार २०० क्विंटल तूर खरेदी केंद्र केली आहे. नाफेडने तुरी खरेदीसाठी १५ एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. शासनाच्या आदेशानंतरच पुढे तूर खरेदी सुरू करण्यात येणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यापूर्वी नाफेडने शेतकऱ्यांकडून तूर खेरदी बंद केली होती. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात अचलपूर बाजार समिती व चांदूरबाजार बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. बाजार समितीने ७ एप्रिल रोजी तूर खेरदी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर तुरीचे २०० पोती टाकली होती. यावर्षी तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर झाले आहे. केंद्र सरकारने आधीच तूर आयात केली. तेव्हा शासनाने दोन वेळा तूर खरेदी बंद केली. विरोधी पक्षांनी तूर खरेदी बंदीविरोधात रान पेटविल्यावर शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. वरोऱ्यात पहिल्याच दिवशी ५०० क्ंिवटल वरोरा बाजार समितीमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेथे यापूर्वी १० हजार २०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर नाफेडने पुन्हा मंगळवारपासून हे खेरदी कें द्र सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी ५०० क्विंटल तूर खेरदी करण्यात आली. नाफेड एफएक्यू या दर्जाची तूर खेरदी करीत आहे.जिल्हाधिकारी-पालकमंत्र्यांना पत्रचंद्रपूर बाजार समितीमध्ये भारतीय धान्य महामंडळाने खरेदी केंद्र सुरू केले होते. ते गेल्या महिन्यापासून बंद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही चंद्रपूर बाजार समितीत खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. चंद्रपूरच्या खरेदी केंद्रावर गडचिरोली, राजुरा, कोरपना या भागातूल तूर विक्रीसाठी येत असते. त्यामुळे चंद्रपूर बाजार समितीत तूर खेरदी केंद्र सुरू करण्याची मागणी करीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना पत्र देण्यात आले आहे. बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे व उपसभापती रंजित डवरे यांनी खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
चंद्रपुरात तूर खरेदी बंदच
By admin | Updated: May 17, 2017 00:34 IST