शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चंदईनाला प्रकल्पग्रस्त झाले निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:05 IST

‘आधार कुणाचा नाही’ हे मराठी गाणे म्हणण्याची वेळ सध्या चंदईनाला प्रकल्पग्रस्तांवर आली आहे. चंदईनाला प्रकल्पग्रस्त झाले निराधार असेच सध्या या परिसरात ऐकायला मिळत आहे.

ठळक मुद्देशासनाकडून थट्टा : साखळी उपोषणाचा शंभरावा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : ‘आधार कुणाचा नाही’ हे मराठी गाणे म्हणण्याची वेळ सध्या चंदईनाला प्रकल्पग्रस्तांवर आली आहे. चंदईनाला प्रकल्पग्रस्त झाले निराधार असेच सध्या या परिसरात ऐकायला मिळत आहे. गेल्या शंभर दिवसांपासून चंदईनाला येथील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी प्रकल्पाला कुलूप ठोकून प्रकल्पाच्या पाळीवरच कुटुंबासह साखळी उपोषण करीत आहेत. मात्र शासनाने अद्यापही प्रकल्पग्रस्तांची दखल घेतली नसल्याने रोष पसरला आहे.सन १९७६-७७ मध्ये निमढेला वासीयांची शेतजमीन व घरे सरकारने संपादित केले. मात्र त्यांना हक्काच्या घरापासून व शेतजमिनीपासून तसेच नोकरीपासून वंचित ठेवले. त्यामुळे प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून गेल्या ४० वर्षांपासून आपल्या न्याय हक्कासाठी प्रकल्पग्रस्त लढत आहेत. पण त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य व मदत मिळत नसल्याने ते हलाखीचे जीवन जगत आहे.‘तुम्हाला जिथे शेतजमीन देवू, तिथे तुम्हाला जावे लागेल, असे सांगून त्यांना तात्पुरते म्हणून जलसंपदाच्या जागेवर राहण्यास जागा दिली. तसेच त्यांच्या शेतजमिनीची व घराची शिल्लक असलेली रक्कम त्यांना दिली नाही व एक व्यक्ती शासकीय नोकरीवर घेवू असे सांगून अजूनपर्यंत त्यांना नोकरीवर घेतले नाही. या सर्व मागण्या घेवून निमढेलाग्रामवासी १० आॅगस्टपासून कुटुंबासह साखळी उपोषणाला बसले. आज उपोषणाचा १०० वा दिवस आहे. मात्र यावर प्रशासनाने कुठलाच तोडगा काढलेला नाही.प्रकल्पग्रस्तांचे रेकॉर्डच गहाळउपोषण काळात अनेकदा जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक लावण्यात आली होती. त्यात जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पाधिकारी यांना या प्रकरणाबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रशासनाने स्वत:वरील जबाबदारी झटकून तुम्ही प्रकल्पग्रस्त असल्याचा व तुमच्या जमिनी प्रकल्पात गेल्याचा पुरावा आणण्यास सांगितले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी जिल्ह्यातील चिमूर, मूल, गोंडपिपरी, वरोरा, चंद्रपूर हे उपविभागीय कार्यालय पालते घालूनही ते प्रकल्पग्रस्त असल्याचा व त्यांच्या जमिनीचा किंवा अवॉर्ड कॉपीबद्दलचे दस्तऐवज त्यांना सापडले नाही. यामुळे प्रकल्पग्रस्तांचा रेकॉर्डच गहाळ झाला की काय, अशी शंका प्रकल्पग्रस्त वर्तवित आहेत.आंदोलन अधिक तीव्र करणारगेल्या काही दिवसांपासून वृत्तवाहिन्यांवर ‘होय मी सरकारचा लाभार्थी’ अशी जाहिरात पाहावयास व ऐकायला मिळत आहे. मात्र गेल्या चाळीस वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असणाºया चंदईनाला प्रकल्पग्रस्तांना याबाबत विचारले असता सरकार ही जाहिरात करून आमची थट्टाच करत असल्याचा आरोप केला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार असून आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.