शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

चांदा फोर्ट-जबलपूर सुपरफास्ट रेल्वे गाडीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्याचे जबलपूर, बालाघाट शहराशी औद्योगिक संबंध आहेत. व्यावसायिक, औद्योगिक व सर्वसामान्य नागरिकांना त्या दोन्ही शहरात ये-जा करण्यासाठी चांदा फोर्ट ते जबलपूर सुपरफास्ट गाडीची अत्यंत आवश्यकता होती. यासंदर्भात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे मंगळवारी या गाडीचे चांदा फोर्टवर आगमन झाले.

ठळक मुद्देनवीन गाडीमुळे साडेआठ तासात गाठता येणार जबलपूर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर व जिल्ह्यातील उद्योजकजगत व प्रवाशांना थेट जबलपूर, बालाघाट शहरात जाण्यासाठी चांदा फोर्ट ते जबलपूर सुपरफास्ट गाडी सुरू करण्यात आली. मंगळवारी दुपारी १. ४५ वाजता या गाडीचे चांदा फोर्टवर आगमन होताच चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी लोको पायलटला पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.चंद्रपूर जिल्ह्याचे जबलपूर, बालाघाट शहराशी औद्योगिक संबंध आहेत. व्यावसायिक, औद्योगिक व सर्वसामान्य नागरिकांना त्या दोन्ही शहरात ये-जा करण्यासाठी चांदा फोर्ट ते जबलपूर सुपरफास्ट गाडीची अत्यंत आवश्यकता होती. यासंदर्भात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे मंगळवारी या गाडीचे चांदा फोर्टवर आगमन झाले. यावेळी चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे पुनम तिवारी, खुशाल बोंडे, माजी उपमहापौर अनिल पुलझेले, भाजप महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. भुपेश भलमे, रमेश बोथरा, संदीप आगलावे, नगरसेविका ज्योती गेडाम, श्याम कनकम, प्रदीप किरमे, नरेश लेखवानी आदी उपस्थित होते. 

असे आहे वेळापत्रकचंद्रपूर ते जबलपूर व्हाया नागपूर, इटारसी जावे लागत होते. त्यामुळे १२ तासांचा वेळ जायचा. नवीन गाडीमुळे केवळ साडेआठ तासात जबलपूरला जाता येणार आहे. ही गाडी दर मंगळवार, गुरूवार व शुक्रवारी चांदा फोर्टवर दुपारी १. ४५ वाजता येईल. भविष्यात या गाडीचा थांबा मूल, मारोडा, नागभीड, वडसा व सौंदड स्थानकावर देण्यात येणार आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे