शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी चंद्रपूर एसडीओकडून अडवणूक

By admin | Updated: July 23, 2016 01:36 IST

चंद्रपूरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी विनोद हरकंडे यांनी ओबीसी पालकांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देण्यासाठी एक नवीनच नियम लावणे सुरू केले आहे. ...

बळीराज धोटे : प्रमाणपत्र न दिल्यास २६ ला धरणे

चंद्रपूर : चंद्रपूरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी विनोद हरकंडे यांनी ओबीसी पालकांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देण्यासाठी एक नवीनच नियम लावणे सुरू केले आहे. नॉन क्रिमीलेअरसाठी गेल्या तीन वर्षांचे उत्पन्न ४.५ लाखांपेक्षा कमी असल्यास प्रमाणपत्र दिले जायचे. महाराष्ट्रात इतर सर्वत्र तसे दिल्या जातात. पण जुलै महिन्यापासून एसडीओ हरकंडे यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रे स्वाक्षरीविना अडवून ठेवली आहेत. हरकंडे यांनी चालविलेला अडवणुकीचा प्रकार म्हणजे ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित करण्याचा एक डाव आहे, असा आरोप ओबीसी फेडरेशनचे संयोजक व सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे. हरकंडे यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देण्यासाठी जातीचा उल्लेख असलेला १९६५ पूर्वीचा महसूल दाखला मागितला आहे. वास्तविक जात प्रमाणपत्र मागणी करताना व त्याची पडताळणी करताना या सर्व गोष्टी तपासूनच जात प्रमाणपत्र दिले जाते. नॉन क्रिमीलेअरसाठी पालकांचे केवळ मागील तीन वर्षांचे उत्पन्न पाहिले जाते. मागील तीनपैकी एकाही वर्षांचे उत्पन्न ४.५ लाखाचे आत असल्यास त्या पालकाला नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र दिले जाते. पण चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी हरकंडे यांनी लहरीपणाचा कळस केला आहे. यासंदर्भात धोटे यांनी गुरुवारी चंद्रपूर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला भेट दिली. नायब तहसीलदारांची भेट घेऊन महसूल कागदपत्र जोडण्याविषयी सरकारचा जी.आर. मागितला असता ते देऊ शकले नाहीत. येत्या २५ जुलैपर्यंत उपविभागीय अधिकारी चंद्रपूर हरकंडे यांनी त्यांच्या स्वाक्षरीसाठी त्यांच्या टेबलवर अडून ठेवलेल्या ओबीसी पालकांच्या नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रांवर स्वाक्षऱ्या करुन ते संबंधितांना न दिल्यास २६ जुलै २०१६ ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हरकंडे यांच्या बडतर्र्फीेसाठी धरणे आंदोलन केल्या जाईल, असा इशारा धोटे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)