शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय चमूने तपासली चंद्रपूरची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2017 00:38 IST

एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचे स्वच्छतेच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून मानांकन केले जाणार आहे.

केंद्राच्या निर्देशानुसार काम : दिल्लीला पाठविले छायाचित्रचंद्रपूर : एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचे स्वच्छतेच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून मानांकन केले जाणार आहे. या अंतर्गत केंद्रातील एका तीन सदस्यीय चमूने बुधवारी चंद्रपुरात येऊन स्वच्छतेची पाहणी केली. शहरातील हॉटेल्स, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानक, रुग्णालय व रस्त्यांचे गोपनीय पध्दतीने निरीक्षण केले.दिल्ली येथील ही चमू मंगळवारी सायंकाळीच चंद्रपुरात पोहचल्याची माहिती आहे. या चमुत विक्रांत भोसले, प्रणय पटेल व चेतन चोरडिया यांचा समावेश आहे. ही चमू आपले स्वतंत्र वाहन घेऊन आले होते. त्यात अत्याधुनिक दूरसंचार सेवाही उपलब्ध होती. या चमूने आज सकाळी मनपा पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी शहराची गोपनीय पध्दतीने पाहणी करणे सुरू केले. विविध ठिकाणावरील फोटो तत्काळ दिल्लीला पाठविण्यात येत होते. या चमूने शहरातील बसस्थानक, तुकूम येथील मातोश्री मंगल कार्यालय, दाताळा मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती, झरपट नदी परिसर, चांदाफोर्ट रेल्वे स्टेशन, शहरातील काही शौचालये व रुग्णालयात भेट देऊन तेथील स्वच्छता न्याहाळली. या संदर्भात मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याश संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की ही चमू केंद्राच्या निर्देशानुसार काम करीत आहे. त्यांचे काम स्वतंत्र रुपात सुरू असून यात मनपा प्रशासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही. मनपा प्रशासनाने शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा कसोशिने प्रयत्न चालविला आहे. पूर्वीपेक्षा आता शहर अधिक सुंदर होत आहे, असे सांगत चमूच्या कार्याबाबत अधिक काही सांगू शकत नाही, असेही ते म्हणाले. (शहर प्रतिनिधी)