शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा

By admin | Updated: August 19, 2015 01:26 IST

जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय तथा सामाजिक संस्थांच्यावतीने स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करण्यात आला. लोकमान्य टिळक विद्यालय, भद्रावती

चंद्रपूर : जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय तथा सामाजिक संस्थांच्यावतीने स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करण्यात आला.लोकमान्य टिळक विद्यालय, भद्रावतीभद्रावती येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लोकसेवा मंडळाचे सचिव मनोहर पारधे, सदस्य विठ्ठलराव पारधे, मधुकर नारळे, विश्वनाथ पत्तीवार, बळवंतराव ताठे, जिल्हा परिषद सदस्य विजय वनाखेडे, उमाकांत गुंडावार, शाळा समितीचे अध्यक्ष विकास उपगन्लावार, बंडू भास्करवार, नामदेव कोल्हे, माजी प्राचार्य भास्करराव ताठे, पी.एम.चिडे, प्राचार्य विनोद पांढरे, पर्यवेक्षक गोपाल ठेंगणे, प्रा.चंद्रकांत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. तायक्वॉंदो स्पर्धेत विजय झालेल्या तीन विद्यार्थ्यानींचा याच कार्यक्रमात गौरव करण्यात आला. भारत विद्यालय नवरगावनवरगाव येथील भारत विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंतराव बोरकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य जयंत बरडे, अशोक नंदनवार, मुख्याध्यापक विजय मुळे, उपमुख्याध्यापक मनोहर पर्वते, सोमेश्वर येलचेलवार, भय्या पुस्तोडे आदी उपस्थित होते. याचवेळी वृक्षारोपणाचाही कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक विजय मुळे यांनी केले. संचालन प्रेमदास परसरामे तर आभार मनोहर पर्वते यांनी मानले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, चंद्रपूरचंद्रपूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे यांच्या कार्यालयात शहर अध्यक्ष शशिकांत देशकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे, राजेंद्र वैद्य, दीपक जयस्वाल, महादेव पिदूरकर, राजेंद्र आखरे, बब्बू इसा, अमित उमरे, महेंद्र लोखंडे, प्रशांत मसादे उपस्थित होते. चंद्रपूर शहर महानगरपालिकाचंद्रपूर शहर महानगर पालिकेत महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी उपमहापौर वसंत देशमुख, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लहामगे, झोन सभापती अंजली घोटेकर, अजय खंडेलवाल, सचिन भोयर, एस्तेर शिरवार, मनपाचे आयुक्त सुधीर शंभरकर, उपायुक्त विजय इंगोले, मुख्यलेखाधिकारी संतोष कंदेवार, शहर अभियंता संतोष बारई, नगर सचिव फैज, नगरसेवक संदीप आवारी, विलास जोगेकर, रत्नमाला वायकर, दुर्गेश कोडापे, नगरसेविका एकता गुरले, नगरसेवक नंदू नागरकर प्रामुख्याने उपस्थित होते. वैभव कॉन्व्हेंट, बल्लारपूरबल्लारपूर येथील वैभव कॉन्व्हेंटमध्ये नगरसेवक राजू झोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे शहर अध्यक्ष शिवचंद द्विवेदी, अ‍ॅड.किशोर पुसलवार, संस्थाध्यक्ष हेमंत मानकर, सचिव रजिया खान यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन अफसाना सिद्धीकी तर आभार संगीता कातकर यांनी मानले.बार असोसिएशन बल्लारपूरबल्लारपूर येथील बार असोसिएशनच्यावतीने न्यायालयाच्या प्रांगणात न्यायमूर्ती एन.एस.पाढेन आणि न्यायमूर्ती एन.एम. पंचारीया यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी बल्लारपूर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्ष अ‍ॅड.मेघा भाले, अ‍ॅड.सुनिल पुरी, अ‍ॅड.सय्यद, अ‍ॅड.बालाजी विधाते, अ‍ॅड.हस्ते, अ‍ॅड.अरविंद तितरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्कॉलर्स सर्च अकॅडमी, कोरपना कोरपना येथील स्कॉलर्स सर्च अकॅडमीमध्ये संस्था अध्यक्ष दिलीप झाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी गोपाळ सातपुते, तुमराम, डॉ.परचाके, नारायण मालेकर, वासुदेव आवारी, प्राचार्य रविंद्र कंडे, संदीप कावडे आदी उपस्थित होते. मातोश्री विद्यालय नवरगावनवरगाव येथील मातोश्री विद्यालयात संस्थापक अनिल गभणे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. ध्वजारोहणानंतर गावातून विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. यासोबतच गावातील आझाद चौक, ग्रामपंचायत, बुद्धविहार मोहल्ला, महादेव मोहल्ला आदी ठिकाणी देखील ध्वजारोहण पार पडले. जनता महाविद्यालय, चंद्रपूर चांदा शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित जनता महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपणाचा कार्यक्रण पार पडला. यावेळी संस्थेचे सचिव अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. सुभाष, विद्यापीठ वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ.जे.एम. सोमाणी, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा.कमलाकर धानोरकर, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.पृथ्वीराज खिंची, डॉ.वाय.वाय. दुधपचारे, डॉ.आशिष महातळे, प्रा.मनिषा महातळे, डॉ.सुनिल नरांजे, डॉ.एफ.डब्ल्यू. निरंजने, डॉ.पी.एस.जोगी, डॉ.मुकुंद शेंडे, डॉ.अमोल ढवस, प्रा.प्रशांत चहारे, प्रा.मालेकर, संजय वाघमारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.मिलिंद जांभुळकर, महाविद्यालयाचे प्रबंधक डी.यू. अडबाले, ए.व्ही.धांदे, पी.जे.वासेकर, ए.बी.घटे उपस्थित होते. रमाबाई आंबेडकर विद्यालय, सावलीसावली येथील रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ कला व माऊंट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.एन.वाय. गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ‘एक व्यक्ती एक वृक्ष’ या बिरुदाअंतर्गत संचाल मंडळातील सर्व सदस्य व कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य यू.एच.भैसारे, सचिव जे.एस.दुधे, संचालक ए.जी.गेडाम, ए.एम.गेडाम, आर.के.गेडाम, पी.यू. गेडाम, डॉ.एच.जे.दुधे, प्राचार्य रामटेके, पर्यवेक्षक घनश्याम भडके आदी उपस्थित होते.विद्यानिकेतन दादावाडी, चंद्रपूरचंद्रपूर येथील जैन सेवा समितीद्वारा संचालित दादावाडी परिसरातील विद्यानिकेतनमध्ये जैन सेवा समितीचे अध्यक्ष राजकुमार पुगलिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आशिषकुमार झा व सीबीएसई विभागाच्या प्राचार्य सपना पिट्टलवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी जैन सेवा समितीचे कार्यकारी अध्यक्ष अ‍ॅड.महेंद्र मरोठी, सचिव राजेंद्र भंडारी, कोषाध्यक्ष खुशालचंद भलगट, संचालक राजेंद्र लोढा, सुरेंद्र खजांची, रविंद्र वैद्य, रविंद्र पुगलिया, रिखबचंद पुगलिया उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक संघ, चंद्रपूरचंद्रपूर येथील रामनगरस्थित ज्येष्ठ नागरिक संघाच्या सांस्कृतिक भवनात ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने विजय चंदावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी केशवराव जेनेकर, सुधाकर वांढरे, दत्तोपंत मामिडवार, सुधीर मुनशेट्टीवार, विठ्ठल घुमडे, मोहन रायपूरे, कुमूद दाणे, श्रीराम तोडासे, रमेश येगिनवार, अरुण दंतुलवार, नानाजी नन्नावरे, मंगला शिंदे, शालिनी हिंगाणे, सुनिता दाणे, वर्षा पाटील यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. योग प्राणायाम केंद्र, आझाद गार्डन चंद्रपूरचंद्रपूर येथील आझाद गार्डन परिसरातील योग प्राणायाम केंद्राच्यावतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विजय चंदावार, अशोक संगिडवार, रमेश येगिनवार, अरुण दंतुलवार, नानाजी नन्नावरे, गंगाधर मुळेवार, बंडू पडवेकर, वनिता गंपावार, द्रोपदी कातकर, सुनंदा मंदे आशा दोनाडकर, विमल रामटके, शालिनी संगिडवार, येरणे, प्रा.भोयर प्रामुख्याने उपस्थित होते. मूक-बधिर विद्यालय चंद्रपूरचंद्रपूर येथील बाबुपेठ परिसरातील मूक बधिर विद्यालयात मूक बधिर शैक्षणिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतराव लहामगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे महासचिव जयेश वऱ्हाडे, तुषार लहामगे, मुख्याध्यापिका सरोज मंगरुळकर, उपमुख्याध्यापक कालिदास बल्की उपस्थित होते. जन शिक्षण संस्थाविदर्भ ग्रामीण विकास शिक्षण मंडळ चंद्रपूर अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या जन शिक्षण संस्था क्रमांक एकमध्ये संचालक हरेंद्र दारूंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी वरिष्ठ लेखापाल राजू पिंपळवार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती वानखेडे, मंदा इंद्दलवार, जयंत चिवंडे, संदीप कापटे, मोहन लडके, प्रभा इठावले आदींनी परिश्रम घेतले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलसनीबेलसनी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक मंसाराम आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बेलसनीचे सरपंच परमेश्वर परसुटकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन इंद्रजीत रायपुरे, राकेश मानलवार यांनी केले. उपस्थितांचे आभार विवेक वल्लपकर यांनी मानले. चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघचंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष मुरलीमनोहर व्यास यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. याच कार्यक्रमात बंडू लडके यांची महाराष्ट्र शासनाच्या नागपूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रगुप्त रायपुरे यांचा बबन बांगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नामदेव वासेकर, वैभव पलिकुंडवार उपस्थित होते.