शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सीबीएसईतही वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशाचा निर्णय होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 17:51 IST

सीबीएसईद्वारा संचालित राज्यातील शाळांमध्ये वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती भारत सरकारचे मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.

ठळक मुद्देमानव संसाधन राज्यमंत्र्यांचे सुधीर मुनगंटीवार यांना आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सीबीएसईद्वारा संचालित राज्यातील शाळांमध्ये वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती भारत सरकारचे मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सीबीएसई शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मागणीच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्याची मागणी भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे केली होती.कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्व शाळांमध्ये वर्ग ८ ते १० च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असताना सीबीएसई शाळांनी अशा कोणत्याही सूचना सीबीएसई बोर्डाने दिल्या नसल्याचे सांगून यासाठी नकार दिल्याची बाब पालकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणली. आ. मुनगंटीवार यांनी त्वरीत मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल व राज्यमंत्री संजय धोत्रे यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून सीबीएसई शाळांना स्पष्ट निर्देश देण्याची विनंती केली. संजय धोत्रे यांच्याशी आ. मुनगंटीवार यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा केली असता सीबीएसईद्वारा संचालित राज्यातील शाळांमध्ये वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती आ. मुनगंटीवार यांना दिली आहे. राज्यातील सीबीएसई शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्याा पालकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा