सिंदेवाही : तालुक्यातील मुरमाडी (कोटा) या गावाच्या शेजारी बैल चारत असताना वाघाने हल्ला करून गुराख्याला जखमी केले. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता घडली, वनपरिक्षेत्र अंतर्गत मौजा मुरमाडी ( कोटा ) गावाशेजारी बैल चारत असताना बेशराव बालाजी घोडमारे (५५, रा.मुरमाडी) यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात ते जखमी झाले. वनपरिक्षेत्र १२८८ क्रमांकाच्या हद्दीत ही घटना घडली. बेशराव यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे वनविभागाच्या मदतीने दाखल करण्यात आले.
वाघाच्या हल्ल्यात गुराखीजखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST