विजय वडेट्टीवार : पत्रकार परिषदेत माहिती लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : तालुक्यातील हळदा, मूग, पदमापूर, किवझी, बोद्रा, एकारा या परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे़ आतापर्यंत सात जणांचा बळी वाघाने घेतला आहे. त्या नरभक्षी वाघाचा बंदोबस्त वनविभागाने त्वरीत करावा, अन्यथा शुक्रवार २३ जून रोजी वनविभागाच्या कार्यालयाला कूलूप ठोकण्याचा इशारा आ. विजय वडेट्टीवार यांनी जनसंपर्क कार्यालयात आयोजित पार पडलेल्या पत्रपरीषदेत दिला़आ. वडेट्टीवार पुढे म्हणाले, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात जंगलाचे प्रमाण कमी आहे. मात्र वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ प्राण्यांना जंगलात शिकार मिळणे कठीण झाल्याने ते गावाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे लोकावर हल्ले करण्याचे प्रमाण सुरू आहे़ नुकतेच हळदा येथे वाघाने हल्ला करून यशवंत चिमूरकर यास गंभीर जखमी केल्याने जनआक्रोश भडकला़ हा आक्रोश पूर्वनियोजित नसून भावनेच्या आधारावर निर्माण झाला आहे़ अश्या भावनिक मुद्द्यांवर गावकऱ्यांवर लाठी हल्ला करण्यात आला आहे़ त्या लाठीहल्ल्याचा निषेध करून संबंधित पोलीस विभागावर कारवाई करून निलंबित करण्यात यावे़ तसेच यापुढे गावातील कोणत्याही लोकांना पोलिसांनी अटक केल्यास मी स्वत:ला अटक करून घेईन असेही ते म्हणाले. पोलिसांच्या अटकसत्रामुळे गावकरी भयभीत होऊन गाव सोडून गेले आहे. त्यामुळे पोलिसांनी अटकसत्र थांबवावे, तसेच गावातून गेलेल्या नागरिकांनी स्वगृही येण्याचे आवाहनही त्यांनी केले.या पत्रपरिषदेला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि़ प़ सभापती दिनेश चोखारे, जि़ प़ सदस्य प्रा़ राजेश कांबळे शहराध्यक्ष बाळू राऊत, विलास विखार, सुधीर पंदिलवार, नितीन उराडे, सुरेश दर्वे, सोमश्वर उपासे व हळदा गावातील अन्य नागरिक उपस्थित होते़ पत्रकार परिषदेनंतर आ. वडेट्टीवार यांनी हळदा गावातील नागरिकांशी भेटून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच अटक केलेल्या नागरिकांना भेटण्यासाठी कोर्टात गेले.जमानतीसाठी प्रयत्नहळदा येथिल ४९ लोकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली़ या सर्वाना शुक्रवारी ब्रम्हपुरी न्यायालयात हजर करण्यात आले होते़ त्यांची भेट घेण्यासाठी आ. विजय वडेट्टीवार न्यायालयात उपस्थित होते. अटक केलेल्या नागरिकांची जमानत मिळण्यासाठी प्रयत्नशील होते़ परंतु शुक्रवारला जमानत मिळाली नव्हती़
नरभक्षी वाघाला पकडा अन्यथा वनकार्यालयाला कूलूप ठोकणार
By admin | Updated: June 18, 2017 00:37 IST