शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्र तपासणी कायदा चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:16 IST

महाराष्ट्र शासनाने केलेल्या जात प्रमाणपत्र तपासणी कायदा चुकीचा असून न्यायतत्त्वाला धरून नाही.

ठळक मुद्देबी.के. हेडावू : हलबा समाज समिती व आदिम कर्मचारी संघटनेची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने केलेल्या जात प्रमाणपत्र तपासणी कायदा चुकीचा असून न्यायतत्त्वाला धरून नाही. महाराष्ट्र शासनाने २००० च्या कायद्याद्वारा २००३ ला जातप्रमाणपत्र तपासणी समितीची निर्मिती केली. परंतु, या समितीच्या अन्यायकारक निर्णयाने अनेक हलबांचे कुटुंब उद्ध्वस्त केले. सक्षम अधिकाºयाने विहित नमुन्यानुसार निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र तपासता येत नाही. जात प्रमाणपत्र तपासण्याची २००० च्या कायद्यात केलेली तरतूद चुकीची आहे. कलम ७९ नुसार असे प्रमाणपत्र मान्य केलेच पाहिजे, कारण ते प्रमाणपत्र सक्षम अधिकाºयाने दिलेले असते. घटनेच्या २६१ (अ) नुसार शासकीय अधिकाºयाने निर्गमित केलेल्या कुठल्याही दस्ताऐवजाला भारतभर प्रामाण्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी उपसचिव महाराष्ट्र शासनी बी.के. हेडावू यांनी केले.स्थानिक जलाराम भवन येथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आदिम कर्मचारी संघटना उर्जानगर आणि आदिवासी हलबा समाज समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून बी.के. हेडावू बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त कार्यकारी अभियंता शरद सोनकुसरे उपस्थित होते. मार्गदर्शन करताना हेडावू म्हणाले, हलबांनी ‘कोष्टी’ हा व्यवसाय स्वीकारला परतु, कोष्टी हीच जात समजून हेतूपुरस्पर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने हलबांची कत्तल करणे सुरू केले आहे. २००० च्या कायद्याने बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या मूळ ढाच्याला छेद दिला गेला, जेव्हा की १३ न्यायधिशांनी केशवानंद भारती केसमध्ये घटनेच्या मूळ ढाच्यात कोणताही बदल करता येत नाही, हे स्पष्ट केले आहे. म्हणजेच २००० च्या महाराष्ट्र शासनाने हेतुपुरस्पर तयार केलेला जातीविषयक कायदा घटनाविरोधी आहे हे स्पष्ट होते. असे ते म्हणाले.याप्रसंगी हलबा समाज समितीचे अध्यक्ष पुंडलिक नंदूरकर, सचिव मनोहर धकाते, आदिम कर्मचारी संघटनेचे कार्यकारी सदस्य विलास निपाने, कार्याध्यक्ष जितेंद्र हेडावू तसेच दोन्ही संघटनांचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अभिजित दलाल, राजू नंदनवार, योगेश धकाते, मधुकर कुंभारे, रेखा बल्लारपूरे, पूजा पराते, पुष्पा जुनोनकर, दुर्गा वैरागडे, रवी धकाते, राकेश कुंभारे, रमेश पराते, अजय नंदूरकर, सुनील धकाते आणि इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यशाळेचे संचालन विलास निपाने यांनी प्रास्ताविक प्रा. डॉ. विजय सोरते यांनी तर आभार ज्योती खाडीलकर यांनी मानले.