शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

सावधान ! घराबाहेर पडलात तर ठाण्यात जाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

संचार बंदीच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व खाद्यपदार्थ पुरवणा?्या सेवा सुरू ठेवलेल्या असून कुठल्याही वस्तूंची टंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी पण अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नये अशी देखील जिल्हाधिकारी यांनी सांगितले.परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील कामगार अडकलेली आहेत अशा कामगारांची प्रशासन व स्वयंसेवी संस्थांमार्फत काळजी घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे निर्देश : सर्व खासगी डॉक्टरांना दवाखाने उघडणे अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम होत आहे. मोठया प्रमाणावर प्रशिक्षण सुरू असून उद्रेकाच्या काळात सामना करण्याची तयारी केली जात आहे. मात्र या उद्रेकाच्या मुळाशी असणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारपासून पोलिसांची भूमिका सक्त होणार असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना ताब्यात घेण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडण्याबाबतही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.रविवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या मार्गदर्शनात झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, उपजिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.विनाकारण घराबाहेर पडून कोरोना आजाराला आमंत्रण देणाºया नागरिकांवर आता सक्ती केली जाणार असल्याचे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते यांनी शासनाने दिलेले सर्व नियम व्यवस्थित पाळणे आवश्यक आहे. याबाबत मनमानी करणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.उद्रेकाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असल्यामुळे यावेळी सर्व नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी आपले दवाखाने पूर्ववत सुरू करावे. काहींनी सामाजिक जाणीव ठेवून यामध्ये पुढाकार घेतला आहे. मात्र इंडियन मेडिकल कौन्सिलच्या सर्व सदस्यांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपले दवाखाने पूर्ववत सुरू करावे. कोणाच्या दहशतीमध्ये असणाºया सामान्य रुग्णांकडून नियमित स्वरूपाचे तपासणी शुल्क घ्यावे, दवाखाने सुरू न करणाऱ्या डॉक्टरांवर प्रसंगी कारवाही केली जाईल, असेही आज उच्चस्तरीय बैठकीत स्पष्ट करण्यात आले.संचार बंदीच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व खाद्यपदार्थ पुरवणा?्या सेवा सुरू ठेवलेल्या असून कुठल्याही वस्तूंची टंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी पण अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नये अशी देखील जिल्हाधिकारी यांनी सांगितले.परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील कामगार अडकलेली आहेत अशा कामगारांची प्रशासन व स्वयंसेवी संस्थांमार्फत काळजी घेण्यात येत आहे. अडकलेल्या कामगारांबाबत तिची माहिती स्थानिक लोकांनी देखील आवश्यक असणाºया हेल्पलाइन क्रमांकावर द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे मोफत भोजन हे केवळ निराश्रित बेघर विमनस्क लोकांसाठी आहे त्यामुळे यासाठीचा आग्रह करण्यात येऊ नये. मोफत भोजन वितरण करताना गरजू व्यक्ती उपेक्षित राहू नये, मात्र ज्यांच्याकडे स्वयंपाकाची व्यवस्था आहे अशा कोणत्याही व्यक्तीला या वाटपात सहभागी करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नगरपालिका, नगरपरिषद येथे शेल्टर होमची व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे. त्यांना भोजनाची व वैद्यकीय मदत मिळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील कामगार यांना मदतीची गरज असेल त्यांनी संबंधित तहसील व नगरपालिका त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्यांची पूर्ण व्यवस्था मोफत करण्यात येईल. जिल्ह्यात असणाºया अन्य राज्यातील नागरिकांनी घाबरून न जाता सुविधांचा योग्य वापर घ्यावा व अन्य ठिकाणी असणाºया नागरिकांनीदेखील त्याच ठिकाणी राहून जिल्ह्यात पोहोचण्याचा प्रयत्न करु नये असे, आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक कामगारइतर राज्यांमध्ये अडकलेले आहेत, त्यांची पूर्ण व्यवस्था केली जात आहे.शंभर खाटांचे अद्यावत वार्ड सज्जवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. मोरे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या नेतृत्वात जिल्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात आवश्यक प्रशिक्षण सुरू झाले आहे. वैद्यकीय सेवेसाठी आवश्यक असणारे मास आणि पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले असून आणखी काही साहित्य पोहचत आहे. लवकरच हे साहित्य उपलब्ध होणार असून जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनात शंभर बेडचे अद्यावत कोरोना ट्रिटमेंटवरील वार्ड उभा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यासाठी आवश्यक असणारी कारवाई करण्याचे निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले.सहायता निधीत लाखोंची मदतप्रधानमंत्री सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधी यामध्ये अनेक संस्थांनी लाखो रुपयांची मदत केली आहे. यामध्ये आणखी मदतीची आवश्यकता असून जिल्ह्यातील नागरिक व संस्थांनी स्वत: पुढे येऊन या कोरोनावर मात करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी केले आहे.घरभाड्यासाठी आताच सक्ती करू नयेकोरोनामुळे सर्वत्र बंद असल्यामुळे कोणत्याही घर मालकाने किरायादाराला घर खाली करायला सांगू नये. तसेच एक महिन्याचे घर भाडे सध्या घेऊ नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंतच्या काळामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य केले असुन असेच सहकार्य १४ एप्रिलपर्यंत अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाने भाजीदुकाने लावून दिलेली आहेत. या दुकानांमध्ये भाजी घेताना नागरिकांनी एक मीटरचे अंतर ठेवणे गरजेचे आहे.भाजीविक्रेते, किराणामालकांनी नियम तोडू नयेचंद्रपूर महानगर तसेच जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी आणि सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये काम करणारे भाजीविक्रेते, किराणा दुकानदार व जीवनावश्यक सेवेत असणाºया सर्व दुकानदारांनी, व्यापाºयांनी या परिस्थितीमध्ये कुठल्याही बाबीवर अडून न राहता शासनाच्या निर्देशाप्रमाणे काम करण्याचे स्पष्ट संकेत आज देण्यात आले आहे .

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार