शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

चंद्रपुरात आठ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:38 IST

मुंबईच्या घाटकोपर (पश्चिम) येथील चार मजली इमारत कोसळून १२ जण ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली.

ठळक मुद्दे मनपाचे अफलातून सर्वेक्षण : मुंबईसारखी घटना घडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुंबईच्या घाटकोपर (पश्चिम) येथील चार मजली इमारत कोसळून १२ जण ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून चंद्रपूर शहरातही अशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून चंद्रपुरातील अशा निर्लेखित इमारतींची माहिती घेतली असता चंद्रपुरात केवळ आठच इमारती जीर्ण असल्याची माहिती मिळाली. या इमारत मालकांना केवळ नोटीस बजाविण्यापलिकडे मनपाने काहीही केलेले नाही. त्यामुळे मुंबईसारखी घटना घडल्यास अनेकांना प्राण गमवावे लागण्याची शक्यता आहे.धोकादायक व जीर्ण इमारतींबाबत दरवर्षी स्थानिक प्रशासनाकडून सर्व्हेक्षण केले जाते. याशिवाय नागरिकांच्या तक्रारीवरूनही धोकादायक इमारतींची नोंद केली जाते. मात्र चंद्रपूर महानगर पालिकेने यावर्षी धोकादायक व जीर्ण इमारतींचे सर्व्हेक्षणच केले नसल्याची माहिती आहे. नगर रचनाकार विभागात याबाबत माहिती जाणून घेतली असता, शहरात केवळ आठच इमारती धोकादायक असून त्या इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले.मनपाने हा आकडा सांगितला असला तरी प्रत्यक्षात शहरात स्थिती वेगळी आहे. शहरात आठपेक्षा अधिक इमारती कालबाह्य आणि धोकादायक झाल्याचे शहरात फेरफटका मारला असता दिसून येते. काही इमारतींच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत तर काही लहानसहान घरांचे छत कोसळण्याच्या स्थितीत आहेत.महानगरपालिकेच्या सर्व्हेक्षणात केवळ आठ इमारतीच धोकादायक असल्याचे सांगण्यात आले. या इमारत मालकांना नोटीस बजावल्यानंतर घरमालकाने काय कार्यवाही केली, त्यांनी केली नसेल तर महापालिकेने काय कार्यवाही केली, अशी विचारणा केली असता, दोन वर्षांपूर्वी एक-दोन धोकादायक इमारती पाडण्यात आल्या होत्या. मात्र दोन वर्षांत अशी कार्यवाही झाली नसल्याचे सांगण्यात आले.भिंत कोसळून गेला होता बळीसोमवारी सकाळी खर्रा घेण्यासाठी प्रियदर्शिनी चौकातील पानटपरीवर उभ्या असलेल्या कैलास डोंगी (२४) नामक युवकावर पानटपरीला लागून असलेली सुरक्षा भिंत कोसळली होती. यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. ही भिंतही जीर्ण झाली होती. याशिवाय शहरात अनेक अशा भिंती जीर्ण झालेल्या आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने या भिंती केव्हाही कोसळून अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे.मनपाचे दुर्लक्षकाही इमारतींचा विषय न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने ती इमारत धोकादायक असतानाही पाडता येत नसल्याचे नगर रचनाकार विभागाने सांगितले. शहरात तीन झोन कार्यालय सुरू करण्यात आले असले तरी धोकादायक इमारतींची एकत्रित माहितीच मनपाकडे उपलब्ध नसल्याचेही यावेळी दिसून आले. स्ट्रक्चरल आॅडिट संदर्भात विचारणा केली असता, माहितीच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे धोकादायक इमारतींविषयी मनपा किती दक्ष आहे, हे दिसून येते.