शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२१ बंधाऱ्यांच्या बांधकामांचे करारनामे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

जिल्हा परिषद, लघुपाटबंधारे विभाग, चंद्रपूर येथील सिमेंट प्लग बंधारे, को.प. बंधारे बांधकाम व दुरुस्तीचे कामे मोठया प्रमाणात घेण्यात आले होते. बांधकामाचे कंत्राट घेण्याकरिता कंत्राटदार, मजुर सहकारी सेवा संस्था, तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी बांधकामाचे कंत्राट मोठ्या प्रमाणात मिळविलेले असून करारनामेसुद्धा करण्यात आले होते. परंतु सदर बांधकामे विहित मुदतीत सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे शासनाचा निधी खर्च होत नाही व बंधाºयाचे बांधकाम पूर्ण होत नाही.

ठळक मुद्देविहित मुदतीत काम पूर्ण केले नाही : जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांची कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जे कंत्राटदार विहित मुदतीत बंधाºयाचे काम पूर्ण करीत नाही, अशा कंत्राटदाराबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार जिल्हा जलसंधारण अधिकारी (ल.पा.) यांनी अशा कंत्राटदाराकडील एकूण २१ बंधाºयाच्या बांधकामाचे करारनामे मागील दोन महिन्यात रद्द केलेले असून सुरक्षा ठेव व अनामत रक्कम शासनखाती जमा करण्यात आले आहे.जिल्हा परिषद, लघुपाटबंधारे विभाग, चंद्रपूर येथील सिमेंट प्लग बंधारे, को.प. बंधारे बांधकाम व दुरुस्तीचे कामे मोठया प्रमाणात घेण्यात आले होते. बांधकामाचे कंत्राट घेण्याकरिता कंत्राटदार, मजुर सहकारी सेवा संस्था, तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी बांधकामाचे कंत्राट मोठ्या प्रमाणात मिळविलेले असून करारनामेसुद्धा करण्यात आले होते. परंतु सदर बांधकामे विहित मुदतीत सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे शासनाचा निधी खर्च होत नाही व बंधाºयाचे बांधकाम पूर्ण होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकºयांना सिंचनाच्या सोयीपासुन वंचित राहावे लागत आहे. शासनाचा शेतकºयांप्रति असलेला उद्देश सफल होत नसल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी नाराजी व्यक्त केली होती.

दोन वर्षे कामे घेता येणार नाहीकरारनामे रद्द करण्यात आलेल्या कंत्राटदाराला यापुढे दोन वर्षाकरिता कामे घेता येणार नाही व भविष्यात अशा प्रकारच्या पुनरावृत्ती झाल्यास कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. तसेच जी कामे अद्यापही सुरु करण्यात आलेली नाहीत, अशा कंत्राटदारांना नोटीस तामील करण्यात आली असून मार्च २०२१ अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जे कंत्राटदार दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करणार नाहीत अशा कंत्राटदारांचे करारनामे रद्द करण्याबाबतची कार्यवाही लवकरच करण्यात येणार असल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी, (ल.पा.) जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी कळविलेले आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प