शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

वनहद्द व वीज खांबावरुन केबलचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 22:55 IST

मनुष्य चैनीच्या वस्तुने निपून होण्याचे सुख भोगत आहे. याच चैनीच्या वस्तुपैकी एक असलेल्या दूरचित्रवाणी (टेलिव्हीजन) या मनोरंजन साधनाचा उपयोग सर्वत्र आवडीचा व गरजेचा बनला आहे.

ठळक मुद्देकेबल संचालकांचा प्रताप : अनुचित घटनेतून मोठ्या हानीची भीती

वेदांत मेहरकुळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : मनुष्य चैनीच्या वस्तुने निपून होण्याचे सुख भोगत आहे. याच चैनीच्या वस्तुपैकी एक असलेल्या दूरचित्रवाणी (टेलिव्हीजन) या मनोरंजन साधनाचा उपयोग सर्वत्र आवडीचा व गरजेचा बनला आहे. टेलिव्हीजनवर विविध वाहिन्यांचे कार्यक्रम प्रसारणास महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाºया केबल चालकांनी आपले अधिकाधिक ग्राहक काबीज करण्यासाठी शासन नियम पायदळी तुडवून ग्राहक व इतर जिवांची परवा न करता आपले नेटवर्कचे केबल जाळे धोकादायक स्थितीतून पसरविल्याचा प्रकार शहरासह दिसून येत आहे.टेलिव्हीजन हे उपकरण आज जवळपास प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असून ती काळाची गरज व जीवनाचा एक अविभाज्य घटकच बनला आहे. मात्र या टेलिव्हीजनवर कुठलीही वाहिनी बघावयाची असल्यास केबल अथवा डिश सेवा वापरणे गरजेचे आहे. यात अधिकाधिक चॅनल्स बघण्यासाठी नागरिकांनी केबल नेटवर्कच्या जोडणीला पसंती दर्शविल्याने सर्वत्र मोठ्या शहराहून ग्रामीण खेड्यापर्यंत केबल नेटवर्कचे जाळे पसरलेले आहे. शहरासह संपूर्ण तालुक्यात केबल नेटवर्क सेवा आस्था इंटरप्राईजेसकडून सुरू आहे. सदर सेवा देणाºया या नेटवर्क संस्थेद्वारे शासन नियमान्वये सेट आॅफ बॉक्स वितरित केले. ंप्रत्येक ग्राहकाकडून सेट आॅफ बॉक्सची प्रत्येकी १५०० रुपये एवढी तगडी रक्कम वसुल करून त्यांना मुळ पावती दिलीच नाही. तसेच शहराच्या कानाकोपºयात चंद्रपूर शहरातून येणारा केबल वनहद्दीतील झाडे, टेलिफोन विभागाचे खांब, इलेक्ट्रीक खांब यावर बांधून पोहचविण्यात आला आहे. अनेक ठिकाणी धोकादायक स्थळी केबल जिवंत विद्युत ताराजवळ बांधल्याचे दिसून येते. तर वनहद्दीत झाडे वाकल्याने अनेक ठिकाणी केबल जमिनीवरुन हात पुरण्या इतका उंचावर आला आहे. यामुळे वनहद्दीत वावरणाºया वन्यप्राण्यांच्या जिवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर शहरासह खेड्यापर्यंत पसरविण्यात आलेले केबलचे जोडणी जाळे हे बहुतांश विद्युत खांबावरुन आधार घेत पसरविण्यात आल्याने वीज वितरण कंपनीच्या वायरमन व अन्य कर्मचाºयांना खांबावर चढ-उतार करण्यास कमालीचा अडचणीचा ठरत आहे. अनाधिकृत व कमी उंचीवरुन केबलचे मार्गक्रमण करून केवळ आपल्या मिळकतीसाठी केबल नेटवर्क संचालकांनी धोकादायक परिस्थितीत केबल वायर ओढून नागरिकांना व वाहतुकदारांना त्रस्त करून सोडल्याची ओरडही सुरू आहे. केबल नेटवर्क संचालकांचा हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे.केबल जोडणीधारक ग्राहकांकडून सदर नेटवर्क इंटरप्राईजेसकडून दर महा १८० रुपये वसुल केले जाते, तर देण्यात येणाºया पावतीवर कर, स्थिर आकारणी याबाबतचे रकाने देवूनही त्यात मूळ वसुली रक्कम न भरता केवळ दरमहा १८० रुपये वसुली रक्कमच लिहिल्या जाते.केबल नेटवर्क संचालकांचा हा मनमानी कारभार जोरात सुरू असताना करमणूक विभाग मात्र मूग गिळून बसल्याचे चित्र आहे. चंद्रपूर शहरातून तब्बल ५८ किमी अंतरावर टाकण्यात आलेला केबल जर विद्युत प्रवाहीत तारांना स्पर्श झाल्यास अनेकांच्या घरच्या टेलिव्हीजन उपकरण, यासह अन्य साधनांना हानी पोहचण्याची दाट शक्यता काहींनी वर्तविली आहे. अशा केबल नेटवर्क प्रसारण संस्थेवर कठोर कार्यवाही करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.यासंबंधी अद्याप लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करू.- गोपाल राणा, शाखा अभियंतावनहद्दीतून केबल नेण्याची परवानगी आपल दिली नसून वनहद्दीत केबल आढळल्यास यासंबंधीची कारवाई करू.- डी. एस. राऊतकर,आरएफओ धाबा