शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजार क्विंटल तुरीची खरेदी

By admin | Updated: April 18, 2017 00:48 IST

जिल्ह्यात यावर्षी २५ हजार ५०० क्विंटल तूर खेरदी करण्यात आली. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती व वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते.

खरेदी बंद : चंद्रपुरात एफसीआय व वरोऱ्यात नाफेडचे खरेदी केंद्रचंद्रपूर : जिल्ह्यात यावर्षी २५ हजार ५०० क्विंटल तूर खेरदी करण्यात आली. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती व वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. नाफेडने तुरी खरेदीसाठी १५ एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. नाफेडच्या आदेशानंतरच पुढे तूर खरेदी सुरू करण्यात येणार असल्याचे एका सूत्राने सांगितले.चंद्रपूर जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु चंद्रपूर ते वरोरा हा कापूस, तूर पेरणीचा पट्टा आहे. हे लक्षात घेऊन जिल्ह्यात चंद्रपूर व वरोरा येथे खरेदी केंद्र उघडण्यात आले होते. दोन्ही खरेदी केंद्रावर १५ एप्रिलपर्यंत तूर खरेदी सुरू होती.गेल्या आठवड्यात नाफेडने शेतकऱ्यांकडून तूर खेरदी बंद केली होती. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात अचलपूर बाजार समिती व चांदूरबाजार बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. बाजार समितीने ७ एप्रिल रोजी तूर खेरदी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर तुरीचे २०० पोती टाकली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच वजनकाटा लावून काँग्रेसने प्रतिकात्मक तूर खेरदी केंद्र सुरू करून तेथे शेतकऱ्यांनी तूर विकली.त्यामुळे नाफेडने पुन्हा तूर खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)चंद्रपूर बाजार समितीचीही खरेदीचंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर बाजार समितीने जिल्ह्यात सर्वाधिक तूर खरेदी केली आहे. १४ एप्रिलपर्यंत ९ हजार ५२४ क्विंटल तूर खरेदी झाली होती. १५ एप्रिलची खरेदी धरून व्यापाऱ्यांनी १० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या बाजार समितीच्या आवारातच एफसीआयतर्फे ९ हजार ९०० क्ंिवटल तूर खरेदी करण्यात आली. ही खरेदी विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने केली.वरोऱ्यात साडेपाच हजार क्ंिवटल वरोरा बाजार समितीमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. तेथे ५ हजार ६०० किंटल तूर खेरदी करण्यात आली आहे. नाफेड व एफसीआयने एफएक्यू या दर्जाची तूर खेरदी केली आहे. तर चंद्रपूर बाजार समितीत व्यापाऱ्यांनी सर्वच प्रकारची तूर खरेदी केली.