शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकातील वृक्ष बनले पाहुण्यांसाठी सेल्फी पॉईंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

वसंत खेडेकर । लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : बल्लारपुरातील अद्ययावत, प्रशस्त आणि देखण्या बसस्थानकाबाबत अनेक वैशिष्टये सांगता येतील. एअरपोर्टसारखे ...

ठळक मुद्देबल्लारपुरातील बसस्थानक । दिवाळीत आलेल्या पाहुण्यांना मोह आवरला नाही

वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपुरातील अद्ययावत, प्रशस्त आणि देखण्या बसस्थानकाबाबत अनेक वैशिष्टये सांगता येतील. एअरपोर्टसारखे दिसणाऱ्या या चमचमीत- चकचकीत बसस्थानकावर काही खास सेल्फी स्थळ आहेत. ज्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. त्यात प्रमुख आहेत दोन मोठे देखणे वृक्ष. दिवाळीच्या सुट्यांमध्ये बल्लारपुरात आलेल्या बहुतांश पाहुण्यांनी या वृक्षांसोबत सेल्फी काढून आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे.ज्याला वृक्ष बंधु असे सध्या संबोधले जाते. खरे तर ही वृक्षलाकडं आता बल्लारपूर बसस्थानकाची ओळखच बनून गेली आहेत. बल्लारपूर बसस्थानकाच्या आवारात पिंपळाचे हे दोन विशाल वृक्ष एका कोपऱ्यात उभी होती. या दोनही वृक्षांचे वय असेल ७५-८० वर्षे! बसस्थानकाची नवीन अद्ययावत इमारत उभारणीचे काम सुरू झाले, तेव्हा ही दोन वृक्ष इमारतीच्या कक्षेत येत होते. त्यामुळे या वृक्षांचा अडसर बांधकामात येत होता. त्यावर मग तोडगा काढण्यात आला. ही नैसर्गिक देण तशीच कायम ठेवायची. वृक्षांचा वरचा काही भाग कापायचा आणि वृक्षांची मूळं तशीच कायम ठेवण्यात येवून दोन्ही वृक्षबुंधाभोवती चबुतरे बांधण्यात येवून वृक्षबुंधे आणि चबुतऱ्यांना आकर्षकपणे सजविण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाची कल्पकता फळाला आली आणि आज हे दोन्ही वृक्षबुंधे या स्थानकाचे आकर्षण केंद्र ठरले आहेत. बसस्थानकाच्या दर्शनी भागात ही वृक्षबुंधे असल्याने बसस्थानकाचे प्रवेश करताक्षणीच प्रवाशांच्या ही वृक्षबुंधे नजरेत भरतात. मन वेधून घेतात. बाहेरून आलेल्या पाहुण्यांना बल्लारपूरकर बसस्थानक बघायला नेले असता या वृक्षबुंधाच्या वैशिष्टयाबाबत हमखास सांगतात. ही दोन वृक्षबुंधे बल्लारपूर बसस्थानकाची कायमची ओळख बनली आहे.

टॅग्स :Selfieसेल्फी