शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

१८ गावांचा डोलारा एकट्या चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 12:32 IST

परिचारिकांची पदे रिक्त : रुग्णांची होतेय गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्क मूल: ग्रामीण भागातील आरोग्य समस्या सोडविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र रिक्त पदांच्या ग्रहणाने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मूल तालुक्यातील चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १८ गावांचा डोलारा असून परिचारिकाची पदे रिक्त असल्याने सेवा देण्यास अडचण निर्माण होत आहे. गैरसोय टाळण्यासाठी रिक्त पदे भरणे आवश्यक आहे.

लांब अंतरावर जाऊन उपचार करणे ग्रामीण जनतेला अडचणीचे होत असल्याने गावाजवळच उपचार करता यावा, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मूल तालुक्यातील चिरोलीअंतर्गत १८ गावे येत असून यात चिरोली, जानाळा, फुलझरी, आगडी, कांतापेठ, टोलेवाही, केळझर, खालवसपेठ, सुशी दाबगाव, दाबगाव मक्ता, नलेश्वर, भगवानपूर, व इतर गावांचा समावेश आहे. या गावातून रुग्ण उपचार करण्यासाठी येत असतात.

त्यांना योग्य उपचार होण्याच्या दृष्टीने वैद्यकीय यंत्रणा सज्ज असली पाहिजे मात्र वैद्यकीय अधिकारी असेल तरी परिचारिकाची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे तात्पुरता दिलासा देत रुग्णांवर उपचार सुरू असले तरी ही उपाययोजना तोकड्या स्वरूपात आहे. दररोज शेकडो रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असतात. त्यामुळे सर्वांना योग्य उपचार करणे कठीण जात आहे. आरोग्य केंद्रात पुरेसे कर्मचारी नेमणे आवश्यक आहे. मात्र रिक्त पदे भरली जात नसल्याने अनेक रुग्णांवर उपचार करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. याकडे जिल्हा परिषद चंद्रपूरच्या आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

"करोडो रुपये खर्च करून चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी सर्व सुविधा व कर्मचारी नेमले जातील असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अनेक वर्षांपासून परिचारिकांची पदे रिक्त आहेत. रुग्णाला सलाईन लावल्यानंतर ते काढण्यासाठी बऱ्याच वेळानंतर परिचारिका येत असतात. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे." -स्वी वाळके, सामजिक कार्यकर्ते दाबगाव मक्ता.

"प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही परिचारिकांची पदे रिक्त आहेत. तसेच शासनाचे क्षयरोग निर्मूलन करण्यासाठी बीसीजी लस देण्याची मोहीम आणली आहे. त्यामुळे परिचारिकांना लस देण्यासाठी पाठविण्यात आले आहे. रिक्त असलेल्या पदाची पूर्तता होणे गरजेचे आहे." -डॉ. अश्विनी रामटेके, वैद्यकीय अधिकारी चिरोली

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर