शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणावर चालला बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:30 IST

अतिक्रमणाबाबतची आपली मोहीम आणखी तीव्र करीत मनपाच्या पथकाने बुधवारी बिनबा गेट मटण मार्केट परिसरातील व बियाणी पेट्रोलपंप परिसरातील अतिक्रमण हटविले.

ठळक मुद्देमनपाची मोहीम तीव्र : १७ वर्षांपासूनचे अतिक्रमण हटविले

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : अतिक्रमणाबाबतची आपली मोहीम आणखी तीव्र करीत मनपाच्या पथकाने बुधवारी बिनबा गेट मटण मार्केट परिसरातील व बियाणी पेट्रोलपंप परिसरातील अतिक्रमण हटविले. यात १७ वर्षांपासूनचे पक्के बांधकामही जेसीबी लावून जमोनदोस्त करण्यात आले.मागील काही दिवसांपासून महानगरपालिकेतील अतिक्रमण हटाव पथकाने मोहीम सुरू केली आहे. शहरातील रस्ते, फुटपाथ मोकळे केले जात आहे. आठवडाभरापूर्वी बसस्थानक चौकातील अतिक्रमण हटविले. बागला चौक आणि बंगाली कॅम्प परिसरातील अतिक्रमण हटवून चौक मोकळा करण्यात आला. या ठिकाणी आता चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, बुधवारी हे पथक बिनबा गेट परिसरातील मटण मार्केटमध्ये गेले. तिथे मोहम्मद इलियास व मोहम्मद इकबाल यांनी मनपाने दिलेल्या जागेत अवैधरित्या पक्के बांधकाम करून दुकानाला शटरही लावले होते. सोबतच मागच्या बाजुला असलेल्या ६० बाय ३० फूट जागेतही अवैध बांधकाम केले होते. हे अतिक्रमण जेसीबी लावून तोडण्यात आले. अवैधरित्या उभारलेले शेडही तोडण्यात आले. अवैधरित्या बांधकाम केलेल्या खोल्यांमध्ये जवळजवळ एक ट्रक कोंबड्या होत्या. त्यादेखील बाहेर काढण्यात आल्या. त्यानंतर याच परिसरातील मच्छी मार्केटमधील गाळ्यात मोहम्मद लतिफ इकबाल हुसैन यांना मनपाने दोन गाळे दिले होते. या गाळ्यांमध्ये हुसैन यांनी आपल्या पध्दतीने बांधकाम करून दुकान ‘आल्टर’ केले. हे बांधकामदेखील तोडण्यात आले.ही कारवाई मनपा आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, कर विभाग प्रमुख तुकड्यादास डुमरे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष ठोंबरे, मार्केट निरीक्षक लक्ष्मण आत्राम व अतिक्रमण पथकाने केली.कार्यवाहीपूर्वी पोलिसात एफआयआरअतिक्रमण हटविताना तणावाची स्थिती व इतर अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी मनपाच्या वतीने मंगळवारीच पोलिसात तक्रार दाखल केली होती. मनपाच्या मालमत्तेची अवैधरित्या तोडफोड केल्याचे तक्रारीत नमूद केले होते. त्यानंतर बुधवारी अतिक्रमण तोडण्याची कार्यवाही करण्यात आली.

वारंवार बजावल्या होत्या नोटीसमटण मार्केट परिसरात मोहम्मद इलियास व मोहम्मद इकबाल यांनी मागील १७ वर्षांपासून अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले होते. चंद्रपुरात नगरपालिका असताना कार्यरत प्रत्येक मुख्याधिकाºयांनी हे अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस बजावल्या होत्या. मात्र राजकीय व इतर हस्तक्षेपामुळे आजवर अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही होऊ शकली नाही. यावेळी मात्र आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.फुटपाथही केले मोकळेतुकूम परिसरातील बियाणी पेट्रोलपंप ते विधी महाविद्यालयादरम्यान रस्त्यावरील फुटपाथवर मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले होते. याच फुटपाथवर चिकण व मटण मार्केट थाटण्यात आले होते. तेदेखील हटवून साहित्य जप्त करण्यात आले. या मटण मार्केटबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या, हे विशेष