वरोरा : मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे केंद्र असलेल्या आंबेडकर भवन बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस पाडण्यात आली. त्या इमारतीचे नव्याने बांधण्यात यावे, या मागणीकरिता वरोरा तालुका रिपाइंच्या वतीने तहसीलदार राजेश भांडारकर यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात रिपाई तालुका अध्यक्ष भा.गो. टिपले, प्रदेश उपाध्यक्ष वि.तु. बुरचुंडे, अॅड. शैलेंद्र जिलटे, अनिल वानखडे, भाऊराव निरांजने, मधुकर पथाडे, राहुल डोंगरे, किरण मुन आदींचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)
मुंबईचे आंबेडकर भवन नव्याने बांधावे
By admin | Updated: July 25, 2016 01:18 IST