शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

२३ लाखांचे बजेट पोहोचले ६५ लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:47 IST

बंधारा बांधकामाला एक दोन वर्ष नव्हे तर तब्बल १३ वर्षांचा काालावधी उलटून गेला. राजुरा विधानसभा क्षेत्राचे या कालावधीत तीन आमदार बदलले. बंधारा बांधकामासाठी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे गोवरी येथील बंधारा लाखो रूपये खर्च करूनही अपूर्णच आहे.

ठळक मुद्देशासनाची उदासीनता : १३ वर्षानंतरही गोवरीचा बंधारा अपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : बंधारा बांधकामाला एक दोन वर्ष नव्हे तर तब्बल १३ वर्षांचा काालावधी उलटून गेला. राजुरा विधानसभा क्षेत्राचे या कालावधीत तीन आमदार बदलले. बंधारा बांधकामासाठी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे गोवरी येथील बंधारा लाखो रूपये खर्च करूनही अपूर्णच आहे. वाढीव निधीच्या कचाट्यात सापडलेला हा बंधारा पूर्ण होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगतच्या नाल्यावर बंधारा बांधकामाला २००५ - २००६ ला मंजुरी मिळाली. त्यामुळे गोवरीवासीयांना व परिसरातील शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा लाभ होणार असल्याने शेतकऱ्यांच्या सिंचनाविषयीच्या आशा पल्लवित झाल्या. बंधाऱ्याला मंजुरी मिळाल्यानंतर काम करणे अपेक्षित होते. परंतु काम सुरू झाले नाही. त्यामुळे बंधारा बांधकामाचा आर्थिक बजेट वाढत गेला. त्यानंतर बंधारा बांधकाम उशिरा सुरू झाल्याने कंत्राटदाराने शासनाकडून मिळालेल्या निधीत काम सुरू केले. मात्र बांधकामाचा आर्थिक बजेट वाढल्याने बंधारा बांधकाम रखडले.बंधाऱ्याला वाढीव निधी मिळावा यासाठी जि.प. सदस्य सुनील उरकुडे व बंधारा समिती अध्यक्ष नागोबा पाटील लांडे यांनी आमदार, खासदार व ंसंबंधित विभागाकडे चकरा घातल्या. याबाबत अनेकदा ‘लोकमत’ने गोवरी बंधाऱ्याची व्यथा शासनदरबारी मांडली. त्यामुळे वृत्तपत्रात गोवरीचा रखडलेला बंधारा चांगलाच गाजला. आज तब्बल १३ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी बंधारा अजूनही अपूर्ण आहे.या कालावधीत राजुरा विधानसभा क्षेत्राचे तीन आमदार बदलले. बंधाऱ्याचा २३ लाखाहून बजेट तब्बल ६५ लाखांवर पोहोचला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा बंधारा होणार की नाही, याची चिंता गावकºयांना आता चांगलीच सतावत आहे.गोवरी येथील नागरिकांना या बंधाऱ्याचा लाभ व्हावा व शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा मिळावा, या उद्देशाने या ठिकाणी बंधाऱ्याला मंजुरी देण्यात आली. जि.प. सदस्य सुनील उरकुडे यांनी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून बंधाऱ्याचा वाढीव निधी मंजूर करून बध्ाांरा पूर्ण करावा, याबाबत अनेकदा पाठपुरावाही केला आहे. शासन जलयुक्तसारख्या योजना राबवित असताना हे शेतीसाठी हरीतक्रांतीचे पाऊल असले तरी अनेक जुने बंधारे वाढीव निधीअभावी अखेरच्या घटका मोजत आहे. शासनाने आता याकडे लक्ष देण्याची गरज आहे.शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न भंगलेनिसर्ग शेतकऱ्यांना साध देत नसल्याने शेतीला सिंचनाची अत्यंत आवश्यकता आहे. पाण्याअभावी पिके वाळली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. बंधाऱ्यात आज पाणी असते तर त्याचा लाभ गावकरी व परिसरातील शेतकºयांना झाला असता. मात्र या अपूर्ण बंधाºयाने शेतकºयांचे हरितक्रांतीचे स्वप्नच भंगले आहे.गोवरी गावालगतच्या नाल्यावर बांधलेला बंधारा तब्बल १३ वर्षानंतरही अपूर्ण आहे. संबंधित विभागाने या बंधाऱ्याला आर्थिक बजेटनुसार वाढीव मंजुरी देऊन रखडलेले बांधकाम पूर्ण करावे.-सुनील उरकुडे, जि. प. सदस्य.

टॅग्स :Waterपाणी