शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

नामनिर्देशन पत्र छानणीत बसपाच्या उमेदवारांना फटका

By admin | Updated: November 4, 2016 01:14 IST

बल्लारपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेल्या अर्जाची छानणी बुधवारी करण्यात आली.

बल्लारपूर नगर परिषद निवडणूक : नगराध्यक्ष पदाचे दोन तर नगरसेवक पदाचे १३ उमेदवार बादबल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेल्या अर्जाची छानणी बुधवारी करण्यात आली. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी २२ तर ३२ नगरसेवकांच्या जागेसाठी १९६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील नगराध्यक्ष पदाच्या दोन तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीतील १३ उमेदवारांना बाद करण्यात आले. येथील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बसपाच्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्र छानणीचा फटका बसला आहे. बसपाचे विविध प्रभागातील तब्बल ६ उमेदवारांना निवडणुकीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.येथील प्रभाग- १ ब मधील सोनु शर्मा, प्रभाग- २ अ मध्ये सचीन राजूरकर, प्रभाग- ८ अ मधील पोर्णिमा खोब्रागडे, प्रभाग- १२ अ मधील अरविंद कन्नाके, प्रभाग १३ ब मधील संजय झिल्लेवार व प्रभाग १४ अ मधील स्नेहा लोखंडे या बसपाच्या अधिकृत उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना चुकीची माहिती दर्शविल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सीमा अहिरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास अहीर व मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांनी छानणीदरम्यान त्यांचे अर्ज अवैध ठरविले आहे. यामुळे बसपाच्या गोटात नाराजी दिसून येत आहे.येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यापैकी सुरेश चौधरी व महादेव कांबळे यांचे नामांकन अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. आता १९ उमेदवार शिल्लक असून ११ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतरच निवडणुकीतील चित्र स्पष्ट होणार आहे. आजघडीला नगरपरिषदेच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी १९ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले ओहत. यामध्ये भाजपाचे हरिश शर्मा, काँग्रेसचे एम. व्यंकटेश बालबरैय्या, बीआरएसपीचे राजू झोडे, शिवसेनाचे विनोद उर्फ सिक्की यादव, बसपाचे मारोती सोमकुवर, भारिप बहुजन महासंघाचे उमेश कडू, आरपीआयच्या वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्ताफ हाजी युनुस, आॅल इंडिया मजलीस इतेहदुल मुस्लिम लिगचे शेख अब्दुल रऊफ सुलेमान यांच्यासह नगरसेवक नासीर खान, माजी नगरसेवक भारत थुलकर यांचा समावेश आहे.नगरसेवकांच्या १६ प्रभागातील ३२ जागेसाठी एकूण १९६ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. यातील १६ नामनिर्देशन पत्र छानणीदरम्यान अवैध ठरविण्यात आले. आता मात्र ३२ जागेसाठी १८० उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहे. यावर्षीच्या नगरपरिषदेच्या सार्वत्रीक निवडणुकीत नगराध्यक्ष थेट मतदारातून निवडून देण्याचे असल्यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नमानिर्देशन पत्र दाखल करणे व नामांकन अर्जाची छानणी प्रक्रिया पार पडली आहे. (शहर प्रतिनिधी)