शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलने ग्राहकाभिमुख सेवेवर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:50 IST

दूरसंचार यंत्रणा अधिक गतिमान व्हावी, तिला लोकाभिमुखतेची जोड मिळावी, यासाठी वरिष्ठांनी सहकारी अधिकारी व कर्मचाºयांच्या माध्यमातून प्रभावी कार्य करावे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : दूरसंचार विभागाच्या कामांचा आढावा

चंद्रपूर : दूरसंचार यंत्रणा अधिक गतिमान व्हावी, तिला लोकाभिमुखतेची जोड मिळावी, यासाठी वरिष्ठांनी सहकारी अधिकारी व कर्मचाºयांच्या माध्यमातून प्रभावी कार्य करावे. ग्राहकांच्या तक्रारींचे स्थानिक स्तरावरच निराकरण होईल, अशी व्यवस्था उभी करावी. भ्रमणध्वणी सेवेचे जाळे ग्रामीण क्षेत्रात पसरविण्याकरिता प्रलंबित योजनांचे कार्यान्वयन व्हावे. तसेच आधुनिक यंत्राणेचा लाभ सर्वच स्तरावर पोहचेल याची दक्षता घेत ग्राहकाभिमुख सेवेवर भर द्यावे, अशा सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दूरसंचार सल्लागार समितीच्या बैठकीत अधिकाºयांना दिले.शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीला दूरसंचार विभागाचे महाप्रबंधक रविंद्र पाटील, उपमहाप्रबंधक कोजबे, भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय राऊत, दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य अविनाश राखुंडे, जि. प. सदस्य संजय गजपुरे, नागराज गेडाम, हरिष गेडाम तसेच दूरसंचार विभागाचे अधिकारी अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.ग्राहकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात नाही, अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. ग्रामीण भागात आॅनलाईन बँकींग सेवेसाठी दूरसंचार विभागाने दक्ष राहून शेतकरी तसेच ग्रामीण क्षेत्रातील व्यवसायी व नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी असेही ना. अहीर यांनी बैठकीत सांगितले.यावेळी महाप्रबंधक पाटील यांनी बीएसएनएलतर्फे राबविण्यात येणाºया विविध कार्य व कार्यक्रमाची माहिती सादर केली. चंद्रपूर एक्सचेंज अंतर्गत सर्वच केंद्रावर ३-जी सेवा कार्यान्वित असून येत्या दोन ते तीन महिन्यात सॉफ्टवेअर बदलवून ४-जी सेवा अपग्रेड केली जाणार असल्याचीही माहिती दिली. दूरसंचार विभाग अंतर्गत रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी यासाठी मुख्य महाप्रबंधक, मुंबई यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे पाटील यांनी बैठकीत सांगितले.