शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ-वडिलाची जमिनीच्या वादातून मुलीला मारहाण, ब्रह्मपुरी तालुक्यातील संतापजनक घटना

By राजेश भोजेकर | Updated: April 22, 2023 16:15 IST

मोजणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांसमोर घडला प्रकार

चंद्रपूर : शेतजमिनीच्या वादातून जन्मदात्या बापाने पोटच्या मुलीचा विनयभंग करीत गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना आरमोरी रोडवरील गांगलवाडी टी पॉईंट जवळील सात बारा हॉटेलमध्ये घडली. 

गांगलवाडी टी पॉईंट जवळ कृषी विभागात कार्यरत असलेले गहिनीनाथ जाधवर यांनी पत्नी कौशल्या यांच्या नावे शेतजमीन घेतली. त्याच गटातील शेतीचा काही भाग गहिनीनाथ जाधवर यांचा साळा रामहरी मारोती लाड यांनी सुद्धा घेतला. त्या जागेवर सात बारा नावाचे हॉटेल जाधवर यांचे साळे रामहरी मारोती लाड यांनी उघडले. कालांतराने त्यांच्या जागेला लागून असलेली आपल्या मुलीची शेतजमीन मारोती लाड यांनी अतिक्रमण करून हडपण्याचा प्रयत्न केला . 

याबाबत कृषी अधिकारी जाधवर यांच्या पत्नी कौशल्या जाधवर यांनी सदर वडिलांच्या अतिक्रमणाबाबत पोलीस ठाणे ब्रम्हपुरी व तहसीलदार ब्रम्हपुरी यांच्याकडे रीतसर तक्रार केली. त्याअनुषंगाने काल दि. २१ ला तलाठी तथा मंडळ अधिकारी शेतजमिनी वर मौका तपासणीसाठी आले.

दरम्यान कौशल्या जाधवर आपले म्हणणे उपरोक्त अधिकाऱ्यांसमक्ष मांडत असतांना वडील मारोती लाड, भाऊ रामहरी लाड आणि सुजित हटवार यांनी कौशल्या जाधवर यांना  शिवीगाळ करीत चपलेने तथा लथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये कौशल्या जाधवर यांच्या छातीची पासळी तुटली असून त्या गंभीररीत्या जखमी झाल्या. दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी गंभीर जखमी अवस्थेतील कौशल्या जाधवर यांना ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

यासंबंधीची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून वडील मारोती लाड भाऊ रामहरी लाड व सुजित हटवार यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर