शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

पोटासाठी करतात चित्तथरारक कसरत

By admin | Updated: February 11, 2015 01:13 IST

‘जब तक तेरे पैर चलेंगे तब तक उसकी सांसे चलेगी’ हा संवाद प्रसिद्ध चित्रपटात एका प्रसंगात आहे.

राजकुमार चुनारकर खडसंगी‘जब तक तेरे पैर चलेंगे तब तक उसकी सांसे चलेगी’ हा संवाद प्रसिद्ध चित्रपटात एका प्रसंगात आहे. आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी प्रेयशी आपल्या जीवाची पर्वा न करता काचावर नृत्य करते. मात्र, आपल्या वितभर पोटाची भूक भागवण्याकरिता याहीपुढे जावून भयानक जोखीम पत्करून काचेचे ट्यूबलाईट व काचेच्या शिश्या डोक्यावर व शरीरावर फोडून ते चक्क काचावरुन चालतात. मात्र, त्यांच्या जीवनात हे काचही फुलं बनले आहेत. हा चित्तथरारक प्रसंग मिनी सुपर सायकल सर्कस मधील कलाकार नयन भारती उर्फ निलेश नाईक यांनी करून दाखविल्याने उपस्थितांच्या डोळ्यात अश्रुही आपोआप बाहेर आले. मानवाला जीवन जगण्यासाठी अनेक संघर्ष करावे लागतात. यासाठी प्रत्येक जण आपल्यापरीने कार्य करतो. मात्र समाजात आजच्या घडीला अनेक परिवाराला दोन वेळची चुल पेटवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यात काही व्यक्ती आपल्या अंगी असलेली कला जनतेपुढे दाखवून कलेलाच आपले उपजिविकेचे साधन बनवतात.वर्धा येथील गौरक्षण वॉर्डात राहणारा संच चालक मोहीतकुमार भारती या युवकाने वयाच्या बाराव्या वर्षी घराबाहेर पडून अशाच चित्तथरारक शो मध्ये काम शिकून ही कला आपल्या परिसरातील युवकांना शिकविली. काही कलाकाराच्या मदतीने त्यांनी ‘मिनीसुपर सर्कस’ तयार केला. या संचातील कलाकार गावागावात फिरून आकाशालाच छत करून आपल्या अंगी असलेली कला गावकऱ्यांना दाखवित आहेत.आठ महिने हे कलाकार आपली कला दाखवून कलेतून आलेल्या रकमेतून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. या मिनी सर्कसमध्ये सहा कलाकाराचा समावेश आहे. या कलाकारास या कलेतून महिन्याकाही दहा हजार रूपयांपर्यंत आवक होत असते.मिनी सर्कसमधून नयन भारती उर्फ निलेश नाईक हा कलाकार जळत्या गोलातून सायकल चालवितो, बाभळीच्या काट्यावर शरीर झोकून देणे, गालातून दाबन टाकून पाण्याची बादली उचलने असे अनेक चित्तथरारक प्रयोग दाखवितो. मात्र खडसंगी गावात काल दाखविलेल्या ट्युब लाईट व काचेच्या शिश्याचे काच डोक्यावर व शरीरावर फोडून त्यावर चक्क अनवानी पायानी चालतात. हेच काच इतरांना जखमा करणारे ठरतात. मात्र वाढत्या बेरोजगारीत कामाच्या शोधात असताना स्वाभीमानाने जगावे म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करता दोन वेळच्या जेवणाची चूल पेटविण्यासाठी हेच ‘काच’ मिनी सुपर सायकल सर्कसमधील कलाकार निलेश नाईक यांच्यासाठी फुल झाले आहेत.