शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
2
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
3
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
4
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
5
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
6
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
7
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
8
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
9
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
10
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
11
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
12
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
13
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...
14
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
15
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
16
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
17
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
18
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
19
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा

नगरपालिकेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सेक्स व्हिडीओ पोस्ट झाल्यामुळे उडाली खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 12:41 IST

कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने मदत व्हावी, कामकाजाविषयी मत-मतांतरे प्रगट व्हावी, या हेतुने नगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याने पालिका अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचा एक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केला. यात महिलांचाही समावेश आहे.

ठळक मुद्देग्रुपमध्ये महिलाही : पालिका कर्मचारी-पदाधिकाऱ्यांचा व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप

रवी रणदिवे।आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने मदत व्हावी, कामकाजाविषयी मत-मतांतरे प्रगट व्हावी, या हेतुने ब्रह्मपुरी नगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याने पालिका अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचा एक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केला. यात महिलांचाही समावेश आहे. मात्र रविवारी या ग्रुपवर एका आंबटशौकीन ग्रुप सदस्याने सात-आठ अश्लिल व्हिडीओ टाकल्यामुळे ब्रह्मपुरीत एकच खळबळ उडाली आहे. रविवारी दिवसभर शहरात याच ग्रुप व त्यातील पोस्टविषयीची खमंग चर्चा होत राहिली.ब्रह्मपुरी नगरपरिषदेत सध्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये पालिकेला क्रमांक मिळावा म्हणून अधिकारी, कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. ब्रह्मपुरीला चांगला क्रमांक मिळून शहर स्वच्छ व सुंदर व्हावे, यासाठी नगरसेवकांनीही पालिका पदाधिकारी या नात्याने आपले कर्तव्य बजावावे, असा पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मानस आहे. पालिकेच्या सकारात्मक कार्यात नगरसेवकांचाही सहभाग असावा, या हेतुने पालिकेतील एका कर्मचाºयाने व्हॉट्स अ‍ॅपवर एक ग्रुप तयार केला. पालिकेतील अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांना यात समाविष्ट केले. सहाजिकच यात महिलांचाही समावेश आला. कुठल्याही मुद्यावर निष्पक्ष चर्चा व्हावी, पालिकेच्या कामकाजाविषयी सर्वजण अवगत व्हावे, हाही या ग्रुप तयार करण्यामागील उद्देश. मात्र एका आंबटशौकीन ग्रुप सदस्याला ग्रुप तयार करण्यामागील गांभीर्य व ग्रुपच्या मर्यादेचे भान राहिले नाही. ग्रुपमध्ये महिला असतानाही या आंबटशौकिनाने चक्क सात-आठ अश्लिल व्हिडीओ ग्रुपवर वायरल केले. अश्लिल व्हिडोओ ग्रुपवर येताच प्रथम ग्रुपमधील पालिका अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये आणि नंतर याची सर्वत्र चर्चा होताच संपूर्ण ब्रह्मपुरीतच खळबळ उडाली.रविवारी शहरात दिवसभर नगरपालिकेच्या या ग्रुपची व त्यातील पोस्टचीच चर्चा सुरू राहिली. याबाबत अद्याप कुणीही तक्रार केलेली नाही. एका नगरसेवकाने झालेल्या प्रकाराची पोलीस तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, एका ग्रुप सदस्याकडून सदर अश्लील व्हिडोओ चुकीने पोस्ट झाल्याचे व त्याने माफी मागितल्याचे ग्रुप अ‍ॅडमीनने लोकमतशी बोलताना सांगितले. या संदर्भात मुख्याधिकारी मंगेश खवले यांच्याशी संपर्क साधला असता, आपण या ग्रुपमध्ये नाही. कुणाची तक्रार आल्यास कार्यवाही करू, असे लोकमतला सांगितले.