शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरी कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:29 IST

ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीच्या विविध संघटनांनी पुन्हा रणशिंग फुंकले असून अतिरिक्त सत्र न्यायाधिश व वरिष्ठ दिवाणी न्यायालय तथा अन्य मागण्यांसाठी .....

ठळक मुद्देएसडीओ कार्यालयावर मोर्चा : अतिरिक्त सत्र न्यायाधिश व वरिष्ठ दिवाणी न्यायालयाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीच्या विविध संघटनांनी पुन्हा रणशिंग फुंकले असून अतिरिक्त सत्र न्यायाधिश व वरिष्ठ दिवाणी न्यायालय तथा अन्य मागण्यांसाठी बुधवारी ब्रह्मपुरी शहरात कडकडीत बंद ठेवून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीला शासनाकडून गेल्या ३५ वर्षांपासून हुलकावणी मिळत आहे. त्या मागणीसाठी पुन्हा रस्त्यावर उतरून मागणी रेटून धरण्यात आली. ब्रह्मपुरीमध्ये उपविभागीय कार्यालय आहे. मात्र अतिरिक्त सत्र न्यायाधिश व वरिष्ठ दिवाणी न्यायालय तसेच उपप्रादेशिक (आरटीओ) कार्यालय सुरू करावे, या प्रमुख मागण्या अजूनही पूर्ण न झालेल्या नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.ब्रह्मपुरी तालुक्यावर होणारा अन्याय दूर करावा, या मागण्यासाठी बुधवारी संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारक येथून शहराच्या प्रमुख मार्गाने उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चात हजारो नागरिक सहभागी होते. मोर्चाचे नेतृत्व विविध संघटनांच्या प्रा. सुभाष बजाज, अ‍ॅड. मनोहर उरकुडे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, सुधीर सेलोकर, अशोक रामटेके, विनोद झोडगे, सुयोग बाळबुध्दे, स्वप्नील अलगदेवे यांनी केले. यात तालुका बार कॉन्सील, जेष्ठ नागरिक संघटना, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला आदींनी सहभाग घेतला होता.