शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

By साईनाथ कुचनकार | Updated: February 11, 2024 18:57 IST

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

चंद्रपूर : वारंवार निवेदन देऊनही सरकार शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण मागण्याची दखल घेत नसल्याचा आरोप करत विजुक्टाने यावर्षी बारावी बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

जिल्हाध्यक्ष डॉ. प्रवीण चटप, सचिव प्रा. प्रमोद उरकुडे, जिल्हा संघटक प्रा. महेश मालेकर, प्रा. मानकर, प्रा. बारसागडे, प्रसिद्धीप्रमुख प्रा. नामदेव मोरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आहे मागण्या

२००५ पूर्वी अंशतः अनुदानित शाळांवर रुजू झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन सुरू करा.१०, २०, ३० वर्षांनंतर मिळणारे आश्वासित प्रगती योजना शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करा.

अघोषित उच्च माध्यमिकला अनुदानासह घोषित करून अंशतः अनुदानावरील शाळा व कमविला प्रचलित अनुदान सूत्राने १०० टक्के अनुदान द्यावे. विनाअनुदानितकडून अनुदानितमध्ये बदली स्थगिती उठवावी. उपदानाची रक्कम २० लाख करावी, निवृत्तीचे ६० वर्ष करावे. घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन वाढवावे, उपप्राचार्यांना वेतनवाढ द्यावी.

शून्य कार्यभाराशिवाय शिक्षकाला अतिरिक्त करू नये

आज धरणे आंदोलन

शिक्षक समस्यांची तीव्रता विचारात घेता सोमवारी (दि. १२) नागपूर येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विजुक्टा जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण चटप, सचिव प्रमोद उरकुडे तथा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर