शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

मुलानेच दिले मातेच्या हाती भिक्षापात्र !

By admin | Updated: May 10, 2015 01:07 IST

आज मोठ्या उत्साहाने मातृदिन साजरा केला जाणार आहेत. या दिनाचे औचित्य साधून जन्मदात्या आईची मनोभावे पूजा केली जाणार आहे.

रूपेश कोकावार चंद्रपूर (बाबूपेठ)आज मोठ्या उत्साहाने मातृदिन साजरा केला जाणार आहेत. या दिनाचे औचित्य साधून जन्मदात्या आईची मनोभावे पूजा केली जाणार आहे. एकीकडे आई आणि मुलांच्या पवित्र नात्याची गुंफन सांगणारा भावविभोर सोहळा साजरा होत असताना दुसरीकडे या नात्यातील विदारक चित्रही मनाला सुन्न करून जात आहे. घरची परिस्थिती अत्यंत चांगली असताना एका मुलाने त्याच्या जन्मदात्या आईला अक्षरश: भिकेला लावले आहे. ही अभागिनी दिवसभर हातात भिकेचा कटोरा घेऊन वणवण फिरत आहे.काळाच्या ओघात ‘माणूस’ बदलतो. तशी त्याची जगण्याची जीवणशैलीेही बदलते. मात्र हा बदल घडत असताना अलिकडे नात्यांचाही मनुष्याला विसर पडत चालला आहे. मात्र खुद्द आपल्या जन्मदात्याचाच विसर पडतो, तेव्हा मात्र जीवनशैली बदलली नाही तर माणुसकीच हरवत चालल्याचा प्रत्यय येतो. ज्याने अंगाखांद्यावर खेळवले, ज्या मातेने असह्य वेदना हसत सहन करीत नऊ महिने उरात गोंजारले. आपला हात देऊन चिमुकल्या पावलांना चालायला शिकवले. मात्र आपल्या पोटाचा गोळा पुढे आपल्याच पोटात गोळा उठवेल, तर अशा मातेने ममत्वाची कहाणी कुठे सांगावी ? भिवापूर येथील रहिवासी ८५ वर्षीय वृद्धा सध्या याच प्रश्नाचे उत्तर शोधत फिरत आहे. तिला तिच्याच कुटुंबियांनी दगा दिल्याने एखाद्या सावलीच्या ठिकाणी बसून अक्षरश: भिक्षा मागण्याची वेळ तिच्यावर आज ओढवली आहे.पाच मुले, चार मुली, नातवंड असा कुणालाही हेवा वाटावा, असा तिचा संसार. तरीही त्या ८५ वर्षीय वृद्धेवर भिक्षा मागून जगण्याची वेळ यावी. ही या वृद्धेसाठी आणि पर्यायाने सर्वच मातांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. भिवापूर रहिवासी लक्ष्मीवर (बदललेले नाव) आज ही वेळ आली आहे. विशेष म्हणजे, तिच्याच मुलाच्या निर्देशावरून तिचा नातु तिला भिक्षा मागण्यासाठी सकाळी शहरात सोडतो आणि सायंकाळ झाली की घ्यायला येतो. हा प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे. सकाळपासून भिक्षा मागण्यासाठी वणवण भटकून थकलेल्या लक्ष्मीचे डोळे सुर्य मावळताच नातू न्यायला येणार आणि मी घरी जाईल, या आशेने रस्त्याच्या दिशेने लागलेले असतात. काही वेळातच तिचा नातूही येतो, अन जमा झालेले चिल्लर पैसे एखाद्या दुकानात देऊन ठोक घेऊन आॅटोमध्ये बसून माणुसकी हरविलेल्या मार्गावर मार्गस्थ होतो.