शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांना सोबत घेऊन मुलाने केला वडिलांवरच सिनेस्टाईल प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 21:27 IST

Chandrapur News पहिल्या पत्नीसोबत खावटीचा प्रश्न न्यायालयात सुरू आहे. समझोता न झाल्याने तिच्या मुलाने मित्राला सोबत घेऊन वडिलांवरच सिनेस्टाइल प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी केले.

चंद्रपूर : पहिल्या पत्नीसोबत खावटीचा प्रश्न न्यायालयात सुरू आहे. समझोता न झाल्याने तिच्या मुलाने मित्राला सोबत घेऊन वडिलांवरच सिनेस्टाइल प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी केले. ही घटना वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत मार्डा गावाच्या शिवारात घडली. बापाच्या तक्रारीवरून मुलगा व त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वरोरा येथील रामदेवबाबा मंदिर रोड परिसरातील रहिवासी धनराज नानाजी उमरे (५५) हे यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा कानडा येथे शिक्षक आहेत. त्यांचा विवाह झाला होता. पहिल्या पत्नीपासून एक मुलगा व एक मुलगी आहे. दोघांमध्ये पटत नसल्याने धनराजने दुसरा विवाह केला. याबाबत पहिल्या पत्नीने न्यायालयात प्रकरण दाखल केले. त्यातून तिला धनराज उंबरे यांच्या वेतनातून आठ हजार रुपये दिले जाते.

त्यानंतरही पोटगीबाबत प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. तडजोडीसाठी पहिल्या पत्नी व मुलाने प्रयत्न केला. तडजोड अमान्य झाली. अशातच धनराज उमरे एमएच ३४ झेड ४४९८ दुचाकीने वरोरावरून कानडा येथील शाळेत जात असताना वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्डा गावाच्या शिवारात त्यांना अडविले. पेट्रोल संपले आहे पेट्रोल द्या, अशी मागणी धीरज उमरे व त्याच्या मित्रांनी केली. परंतु धनराज उमरे थांबले नाही. अखेर धनराज उमरेला थांबविण्यात त्यांना यश आले. अशातच सूरज उमरे व त्याच्या मित्राने दगड आणि चाकूने हल्ला चढविला. त्यात धनराज उमरे गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. धनराज घुमरे या बापाच्या तक्रारीवरून मुलगा सूरज व त्याच्या मित्रावर वरोरा पोलीस स्टेशनमध्ये कलम ३०७, ३४, ३४१, ३४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी