शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

बॉयलर मेंटनन्सचा निविदा घोटाळा

By admin | Updated: July 6, 2015 00:46 IST

कंपन्यांमधील मोठ्या कामांचे कंत्राट केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमानुसार देणे अपेक्षित असताना..

एकाच कंपनीवर मेहेरनजर : प्रहार संघटनेकडून चौकशीची मागणीचंद्रपूर : कंपन्यांमधील मोठ्या कामांचे कंत्राट केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमानुसार देणे अपेक्षित असताना चंद्रपुरातील महाऔष्णिक विद्युत केंद्रातील बॉयलर दुरूस्तीच्या कामांच्या कंत्राटात मात्र हे नियम डावलल्याचा आरोप होत आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा करून एकाच कंपनीला वारंवार कामाचे कंत्राट दिले जात असून यात करोडो रूपयांची गैरप्रकार घडत असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेतून केला आहे. मिळालेल्या माहितीच्या अधिकारातून ही बाब कागदोपत्री स्पष्ट दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला असून या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. ते म्हणाले, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुनील हायटेक कंपनीला २०१० ते २०१४ या काळात तब्बल ८८ कामे दिली आहेत. या कामांची किंमत ३० कोटी रूपये आहे. निविदा पद्धतीमध्ये अन्य कंपन्यांच्या निविदा असतानाही एकाच कंपनीला लागोपाठ निविदा मिळणे हा प्रकार संशयास्पद असल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे. या संदर्भात ते म्हणाले, सुनील हायटेक कंपनीला २०१० मध्ये बॉयलर मेटनन्स स्टेज-एकची एकूण पाच कामे दिली होती. त्याची एकूण किंमत एक कोटी १३ लाख ६२ हजार ५०८ रूपये होती. बॉयलर मेंटनन्स स्टेज दोनचे काम १२ लाख ७६ हजर २१८ रूपयांचे होते. टर्बाईन मेंटनन्स स्टेज एकचे काम ४ लाख ९४ हजार रूपये किंमतीचे होते. सन २०११ मध्ये याच कंपनीला पुन्हा बॉयलर मेटनन्स स्टेज एक व दोनची एकूण १८ कामे मिळाली. या कामांची किंमत ७ कोटी १७ लाख ५७ हजार ५१५ रूपये होती. या प्रकारे अ‍ॅश पाईपलाईन मेन्टनन्स आणि सीएचपी-बीएन्युअल मेंटनन्सच्या कामांचे ११ लाख ८७ हजार ७०५ व ५६ लाख ६२ हजार १७१ रुपये किंमतीचे एक काम मिळाले. सन २०१२ मध्ये याच कंपनीला बॉयलर मेंटनन्स स्टेज एक व दोनचे १२ काम मिळाले. या कामांची एकूण किंमत तीन कोटी ५६ लाख ८७ हजार ३२९ रूपये होती. कॉलनी क्वॉर्टर वॉटर प्रुफींगचे एक कोटी ६३ लाख ३२ हजार ५७२रूपये किंमतीचे एक आणि सीएचपी-बी चे ८१ लाख १० हजार ७१६ रूपयांचे एक आणि अ‍ॅश पाईप लाईन मेंटनन्सची दोन कामे मिळाली. २०१३-१४ मध्ये या कंपनीला बॉयलर मेंटनन्सचे ९ कोटी ४२ लाख ३०८ रूपयांचे ३२ कामे दिली. याच प्रकारे टर्बाइन, अ‍ॅश पाईपलाईन, सीएचपी मेंटनन्स, कॉलनी वॉटर प्रुफींग व सीएचपी मेंटनन्सची ४ कोटी ३३ लाख ५४ हजार ८१५ रूपये किमतीची १० कामेही दिली. हा प्रकार संशयास्पद असल्याने याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी) एसीबीकडून तपासाची मागणीनिविदा प्रक्रियेमध्ये सुरू असलेल्या या प्रकाराची सत्तया जनतेपुढे येणे आवश्य आहे. त्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी व्हावी, अशी मागणी प्रहार संगठनेने केली आहे. कंपनीला काळ्या यादीत टाकापप्पू देशमुख म्हणाले, सुनील हायटेक या कंपनीला परळी येथे नव्या प्रकल्पाच्या उभारणीचे काम दिले होते. मात्र त्याच्या पूर्णत्वासाठी बराच अवधी लागला आहे. परिणामत: समस्या वाढल्या आहेत. या प्रकाराची चौकशी करून कंपनीला कायाया यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.