वरोरा : आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक अभ्यंकर वॉर्ड येथील जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिर पार पडले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरच्या चमूच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांकरिता रुग्ण वाहक खुर्चीचे लोकार्पण यासह विविध कार्यक्रम पार पडले.
वरोरा व भद्रावती तालुक्यात गरजूंना ब्लँकेटचे वाटप, रुग्णालयात फळ आणि शॉल वाटप करण्यात आले. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेस अध्यक्ष शुभम चिमूरकर यांच्या नेतृत्वात डॉ ए एम शेख, कृउबास सभापती राजू चिकटे, सुनील वरखडे ,प्रमोद मगरे, कृउबास माजी सभापती तथा विद्यमान संचालक विशाल बदखल, संचालक हरीश जाधव, काँग्रेसचे वरोरा शहर अध्यक्ष विलास टिपले, तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, मनोहर स्वामी, जि. प. सदस्य सुनंदा जीवतोडे, पं. स. उपसभापती संजीवनी भोयर, पं. स. सभापती धोपटे, नगरसेवक गजानन मेश्राम, नगरसेवक राजू महाजन, भद्रावती पं. स. चे माजी उपसभापती भोजराज झाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.