चंद्रपूर : सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सरदार पटेल महाविद्यालतील विविध विभागांतर्फे संस्थेचे दिवंगत अध्यक्ष शांताराम पोटदुखे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिर पार पडले. शिबिरात ५५ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सहसचिव डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रशांत पोटदुखे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्तसंकलन अधिकारी डॉ. अनंत हजारे प्राचार्य डॉ. राजेश इंगोले, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. माधमशेट्टीवार उपस्थित होते. शिबिरात नगरसेवक संजय वैद्य यांनी १०५ वेळा रक्तदान केले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. अनंत हजारे म्हणाले, एक व्यक्ती वर्षातून चार वेळा रक्तदान करू शकतो. रक्तदानाने आरोग्य सुदृढ राहते, असे मार्गदर्शन त्यांनी केले. प्रास्ताविक डॉ. एस. व्ही. माधमशेट्टीवार, संचालन प्रा. कुलदीप गोंड, तर आभार डॉ. वंदना गिरटकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. सतीश कन्नाके, प्रा. डॉ. विजय सोमकुंवर, डॉ. उषा खंडाळे, डॉ. अनिता मत्ते आदींनी प्रयत्न केले.
शांताराम पोटदुखे पुण्यतिथीनिमित्त शिबिरात ५५ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST