चंद्रपूर : स्टेडियम मित्र परिवार व श्री कृपा कॉलनी मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरच्या सहकार्याने रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर रविवारी पार पडले. या शिबिरात ५० जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले तर, अनेकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर जोरगेवार, नगरसेवक पप्पू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात डॉक्टरांच्या चमूंनी दंत, रक्तदाब, मधुमेह व हृदयरोग, नेत्र तपासणी करण्यात आली. आमदार जोरगेवार यांनी उपक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक करून असे उपक्रम नेहमी राबवावेत, असे आवाहन केले. यावेळी नगरसेवक पप्पू देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. अनंत हजारे व त्यांच्या चमूनी आरोग्य तपासणी केली. शिबिराचे पहिले रक्तदाते दिवाकर मदीवार यांना मान मिळाला. शिबिर यशस्वीतेसाठी कृपा कॉलनी मित्र परिवाराने सहकार्य केले.
शिबिरात ५० जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:25 IST