शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

मुख्याधिकाऱ्याच्या कक्षासमोर फोडले मडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:54 IST

चिमूर शहरातील नागरिक मागील काही दिवसांपासून पिण्याचे पाणी आणण्यासाठी भटकंती करीत आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी नगर परिषदेला निवेदन दिले. मात्र यावर त्यांनी काहीही केले नाही. नळाला पुरेसे पाणी येत नसल्याने नागरिकांना व महिलांना दुसºया वॉर्डात भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देतीव्र आंदोलन : चिमुरात संतप्त महिलांचा पाण्यासाठी आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर शहरातील नागरिक मागील काही दिवसांपासून पिण्याचे पाणी आणण्यासाठी भटकंती करीत आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी नगर परिषदेला निवेदन दिले. मात्र यावर त्यांनी काहीही केले नाही. नळाला पुरेसे पाणी येत नसल्याने नागरिकांना व महिलांना दुसºया वॉर्डात भटकावे लागत आहे. या प्रकाराने त्रस्त होऊन महिला व नागरिकांनी सोमवारी नगरपालिकेवर मोर्चा काढला. मोर्चा पालिकेवर धडकताच शेकडो महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी मुख्यधिकारी यांना धारेवर धरले. त्यांच्या दालनासमोरच महिलांनी सोबत आणलेले मडके फोडून आपला संताप व्यक्त केला.यादरम्यान, काही वेळासाठी नगरपरिषदेचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आला होता. मुख्यधिकारी शहा यांनी आठ दिवसात टँकर लावून पाणी देऊ, अशी ग्वाही दिली. तेव्हा महिला शांत झाल्या. पाण्याची गरज वाढली असतानाच विहिरी व हातपंप खोलवर गेले आहे. पाण्याचे स्रोत आटायला लागले आहेत. ५१ कोटी रुपयांची २४/७ ही पाणी पुरवठा योजना न्यायालयात अडकली आहे. ज्या नगरपालिकेला शासनाने पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केली. तीच नगरपालिका बांधकाम करण्याचे कारण पुढे करून या योजनेविरोधात न्यायालयात गेली आहे. त्यामुळे शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.चिमूर शहरासह समाविष्ट अनेक गावातील पिण्याच्या पाणी पुरवठा योजना अपूर्ण असून कुठे पाईपलाईन अपूर्ण कुठे टाकी अपूर्ण तर कुठे विहीर अपूर्ण. असे असताना त्या गावातील नागरिकांना या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दूरवरून किंवा दुसºया वॉडार्तून महिलांना पाणी आणावे लागत आहे. ही परिस्थिती एप्रिलमध्ये असून मे, जून हे उन्हाळ्यातील महिने बाकीच आहे. तालुका दुष्काळ ग्रस्त असून नगरपरिषद प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे होते. मात्र एप्रिलमध्ये भिषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे तर पुढील महिने कसे काढायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला.दरम्यान, हा संताप सोमवारी रस्त्यावर निघाला. आज प्रभाग १० चे नगरसेवक सतीश जाधव, प्रभाग १५ चे नगरसेवक नितीन कटारे, आबिद शेख, भाजपचे तालुका उपाध्यक्ष हरीश पिसे यांच्या नेतृत्वाखाली ोकडो महिला नगरपरिषदेवर मडके, घागरी घेऊन धडकल्या. यात जेष्ठ महिला, तरुणींचाही समावेश होता. पाणी मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, पाणी नाही तर टॅक्स नाही, अशा घोषणा देत महिलांनी नगरपालिका समोर मडके फोडले, मुख्याधिकारी यांच्या कक्षासमोरील पोर्चमध्ये मडके फोडून आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनात नगरसेविका छाया कनचलवार, उषा हिवरकर, हेमलता ननावरे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.मुख्याधिकाऱ्यांना सवालन.प. हद्दीतील चिमूर व समाविष्ट करण्यात आलेल्या १३ गावातील नागरिकांना सात दिवस २४ तास पिण्याचे पाणी मिळावे म्हणून आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी विषेश प्रयत्न करून राज्य शासनाकडून ५१ कोटी रुपयांची योजना मंजूर करून आणली होती. या योजनेचे काय झाले, असा सवाल नागरिकांनी यावेळी मुख्याधिकारी शहा यांना विचारला. तेंव्हा ती योजना न्यायालयात असून न्यायालये जे आदेश देईल, ते पाहूनच पुढील कार्यवाही होईल, असे सांगितले.