शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

देशाला प्रगतीपथावर नेणारा अन् विकासासाठी झटणारा पक्ष म्हणजे भाजपा- सुधीर मुनगंटीवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2023 16:40 IST

रमेश बुच्चेसह  येरूर गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

चंद्रपूर: देशातील शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा विचार करणारा पक्ष म्हणजे भाजपा. विश्वगौरव, देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास या संकल्पनेसोबत राष्ट्राचा विकास साधायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही, देशाला प्रगतीपथावर नेणारा आणि विकासासाठी झटणारा पक्ष म्हणजे भाजपा असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की विकासाच्या आणि विनाशाच्या लढ्यामध्ये अनेकांनी आज विकासाची म्हणजे भाजपाची कास धरली आहे. रमेश बुच्चे यांच्यानेतृत्वात  भाजपा पक्ष प्रवेश अनेक कार्यकर्त्यांनी केला, आपल्या भागातील विकासाला प्राधान्य देण्यासाठी योग्य निर्णय घेतला आहे. आपण पूर्ण शक्तीनिशी पक्षात प्रवेश करणाऱ्यांच्या पाठीशी राहु, असे मुनगंटीवार म्हणाले. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे कानाकोपऱ्यात विकासाची गंगा पोहचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. केंद्र आणि राज्यात भाजपाचेच सरकार असल्याने विकासाला आता गतिरोध बसणार नाही, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

शेतकरी अडचणीत असल्याचे नमूद करीत मुनगंटीवार म्हणाले की, शेती हा चिंता कमी करणारा व्यवसाय झाला पाहिजे. त्यासाठी मिशन 'जय किसान' सुरू करण्यात आलेले आहे. या मिशनच्या माध्यमातून चंद्रपुरातील शेतकऱ्यांचा कायापालट व्हावा. महिला सशक्तीकरणावर केवळ चर्चा न होता आंतरराष्ट्रीय महिला दिनी त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावरही चर्चा होणे गरजेचे आहे. महिलांच्या उद्योजकतेबाबत चर्चा झाली पाहिजे. कामगारांच्या हिताचा निर्णय मंत्रिमंडळात करण्यात आला. कामगारांचे तास, त्यांचा भविष्य निर्वाह निधी याची निश्चिती या निमित्ताने झाल्याचा आनंद वाटतो, असे मुनगंटीवार म्हणाले.

पक्ष प्रवेश कार्यक्रमात ज्ञानेश्वर बोबडे,बाळा बिटे,रामभाऊ बुच्चे,प्रेम जोगी,सुधीर तुरारे,विजय तुरारे,आवेश आवळे, अनिल उपरे, विकास तुराणकर,गणपत करपीते, आशिक शुद्दलवार,रमेश सोनटक्के,प्रशांत जोगी, नितीन कडस्कर, नंदू श्रीखंडे, गोपिका निखारे, पायल झाडे, नंदा धोरुडे, वैशाली मोरे, सुवर्णा बिटे, किरण वैद्य, पंचफुला जोगी, नीलिमा बुच्चे व अन्य शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपा