शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

मनपात भाजपाला स्पष्ट बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 01:02 IST

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीची शुक्रवारी मतमोजणी पार पडली. यात भाजपाचे सर्वाधिक ३६ उमेदवार

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीची शुक्रवारी मतमोजणी पार पडली. यात भाजपाचे सर्वाधिक ३६ उमेदवार विजयी झाले असून सत्तेसाठी लागणारा जादुई आकडाही भाजपाने आजच पार केला. मागील पंचवार्षिकच्या तुलनेत काँग्रेस आणखी पिछाडीवर गेला असून काँग्रेसला केवळ १२ जागांवरच समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच बसपाने आठ जागांवर विजय मिळवित सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. शिवसेना, मनसे, राकाँ यांनी प्रत्येकी दोन जागा घेतल्या तर चार जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले. १७ प्रभागातील ६६ जागांसाठी १९ एप्रिलला मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी ५२.५६ होती. पाचही झोन मिळून एक लाख ५८ हजार ७५१ मतदारांनी मतदानात भाग घेतला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने नागरिकांना मतदानासाठी आवाहन करूनही खालावलेली टक्केवारी हा सर्वच पक्षांसाठी चिंतेचा विषय होता. दरम्यान शुक्रवारी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरूवातीला संथगतीने झालेल्या मतमोजणीने दुपारनंतर वेग घेतला. निकालाची प्रतीक्षा करीत हजारो कार्यकर्ते भर उन्हात ताटकळत होते. उमेदवारांच्या समर्थकांच्या गर्दीने जिल्हा क्रीडा संकुलाचा परिसर गजबजून गेला होता. भाजपा आणि काँग्रसेस या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतीष्ठेची बनविली होती. भाजपाकडून प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेला आले होते. तर, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा झाली. या सोबतच, भाजपाकडून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना श्यामकुळे, काँग्रेसकडून माजी खासदार नरेश पुगलिया, शिवसेनेकडून आमदार बाळू धानोरकर आदी मंडळी रिंगणात उतरली होती. यामुळे मनपाचा राजकीय आखाडा गजबजून गेला होता. ६६ सदस्यसंख्या असलेल्या चंद्रपूर महानगर पालिकेत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवित काँग्रससह सर्वच पक्षांच्या जागा घटविल्या आहेत. भाजपाने प्रारंभीपासूनच आघाडी घेतली होती. ६६ पैकी ३६ उमेदवार निवडून आल्याने भाजपाने सत्ता स्थापनेसाठी होणारा वादविवाद येथेच संपवून टाकला. प्रभाग क्रमांक १ दे.गो. तुकूममध्ये मागील पंचवार्षिकमध्ये शिवसेनेने वर्चस्व स्थापित केले होते. मात्र यावेळी येथून शिवसेनेचा सफाया करीत भाजपाने संपूर्ण प्रभाग काबीज केला आहे. या प्रभागात भाजपाचे सुभाष कासनगोट्टूवार, शिला चव्हाण, अनिल फुलझेले आणि माया उईके हे चारही उमेदवार निवडून आलेत. सुभाष कासनगोट्टूवार यांनी शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक बंडू हजारे यांचा तब्बल ३१४५ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक २ शास्त्रीनगरमध्ये भाजपाने तीन तर शिवसेनेने एक जागा मिळविली. येथून भाजपाच्या शितल गुरनुले, वनिता डुकरे, सोपान वायकर व शिवसेनेचे सुरेश पचारे हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक ३ एमईलमधून भाजपाचे तीन तर मनसेचा एक उमेदवार निवडून आला. यात भाजपाचे वंदना जांभूळकर, अंकूश सावसाकडे व चंद्रकला सोयाम आणि मनसेचे सचिन भोयर यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्पमधून भाजपाच्या जयश्री जुमडे, काँग्रेसच्या संगिता भोयर आणि अहमद मन्सूर व अपक्ष उमेदवार अजय सरकार हे विजयी झाले. या प्रभागात भाजपाला केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले. प्रभाग क्रमांक ५ विवेकनगरमध्ये भाजपाने तीन जागांवर विजय मिळविला. काँग्रेसला येथे एकाच जागेवर समाधान मानावे लागले. येथून भाजापाच्या पुष्पा उराडे, संदीप आवारी व अंजली घोटेकर तर काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष सुरेश महाकूळकर हे विजयी झाले. बहुमतांनी विजय दे.गो. तुकूम प्रभागातून भाजपाचे सुभाष कासनगोट्टूवार यांनी ५,२०१ मते घेतली. त्यांचे निकटतम उमेदवार शिवसेनेचे बंडू हजारे यांनी २,०५६ मते घेतली. कासनगोट्टूवार यांनी तब्बल ३,१४५ मतांनी आपला विजयोत्सव साजरा केला. त्यापाठोपाठ काँग्रेसचे प्रशांत दानव यांनी विठ्ठल मंदिर प्रभागातून ६,२८८ मते घेऊन भाजपाचे श्रीहरी बनकर (३,७०१) यांच्यावर २ हजार ५८७ मतांनी मात केली. विठ्ठल मंदिर प्रभागातून भाजपाच्या संगिता खांडेकर यांनी ५ हजार २७४ मते घेऊन काँग्रेसच्या अनिता कथडे यांचा तब्बल २ हजार ४१८ मतांनी पराभव केला. महाकाली प्रभागातून कल्पना लहामगे यांनी ४ हजार १३ मते घेत निकटतम उमेदवार भाजपाच्या वनिता कानडे (२३९६) यांचा १ हजार ६१७ मतांनी पराभव केला. या विद्यमानांना घरचा रस्ता या निवडणुकीत मतदारांनी विद्यमान नगरसेवकांना चांगलाच धक्का दिला. मागील पंचवार्षिकमध्ये त्यांना निवडून दिल्यानंतर यावेळी मात्र त्यांना घरचा रस्ता दाखविला. यात काही दिग्गजांचाही समावेश आहे. यात संजय वैद्य, रामू तिवारी, प्रविण पडवेकर, महेंद्र जयस्वाल, बलराम डोडाणी, आकाश साखरकर, सुनिता अग्रवाल, रत्नमाला बावणे, उषा धांडे, योगिता मडावी, बंडू हजारे, विनय जोगेकर, मनोरंजन राय, राजेश अड्डूर, संगिता पेटकुले, करीमलाला काझी, लता साव, राजकुमार उके, शिल्पा आंबेकर, सुषमा नागोसे, अजय खंडेलवाल, धनंजय हुड, अनिता कथडे, दुर्गेश कोडाम, महानंदा वाळके यांचा समावेश आहे.