ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर,दि.14 - जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आज झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांवर भाजपाचा झेंडा फडकला आहे . हे यश जनतेने भाजपावर दाखविलेल्या विश्वासाचे द्योतक असून चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलवू अशी ग्वाही वित्तमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे . नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती व उपसभापतींचे अभिनंदन करत ना मुनगंटीवार यांनी विकास प्रक्रियेत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले आहे .