शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नगरसेवकावर शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:53 IST

चंद्रपूर : घरावर अतिक्रमण करण्यात येत असल्याने, भाजप नगरसेवकांकडे मदत मागण्यासाठी गेले असता, भाजप नगरसेवक तथा मनपा गटनेता संदीप ...

चंद्रपूर : घरावर अतिक्रमण करण्यात येत असल्याने, भाजप नगरसेवकांकडे मदत मागण्यासाठी गेले असता, भाजप नगरसेवक तथा मनपा गटनेता संदीप आवारी यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने शनिवारी पत्रकार परिषदेत केला. याबाबतची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असाही आरोप संबंधित महिलेने यावेळी केला.

सरकारनगर पाण्याच्या टाकीजवळ दलविंदर कौर सेवासिंग पटवालिया यांचे वडिलोपार्जित घर आहे. दलविंदरच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना वारसा हक्काने घर मिळाले. त्या घरी एकट्याच राहतात. याचाच फायदा घेत, त्यांच्या भाऊ दलजीत सिंग याने गंगाधर वानखेडे, वंदना वानखेडे याच्यासोबत १५ फेब्रुवारीला जबरदस्ती घरी घुसून अतिक्रमण केले, तसेच घराची एक भिंत पाडली. याबाबत मदत मागण्यासाठी भाजप नगसेवक संदीप आवारी यांच्याकडे गेल्या असता, त्यांनी शरीरसुखाची मागणी केली, असा आरोप करीत याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत दलविंदर कौर सेवासिंग पटवालिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोट

ती मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. तिने दुसऱ्या व्यक्तीला घर विकले आहे. ती एका मिनिटासाठी माझ्या घरी आली. माझी पत्नीही घरीच होती. तू घर विकले आहे, असे म्हणताच, तुम्हीही त्याच्यासोबत मिळून असल्याचा समज केला. तिने केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. तिची आणि माझी नार्को टेस्ट करावी, मी दोषी आढळल्यास राजकारणातून संन्यास घेणार.

संदीप आवारी, नगरसेवक मनपा, चंद्रपूर