शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबात २०० पशु, पक्ष्यांचा आवाज काढणारा ‘बर्डमॅन’

By राजेश भोजेकर | Updated: April 7, 2023 11:07 IST

देश-विदेशातील पर्यटक जंगल सफारी व व्याघ्र सफारीसाठी ताडोबात येत असतात.

चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध पशु पक्ष्यांचे २०० आवाज काढणारा अनोखा अवलिया कार्यरत आहे. ताडोबामध्ये येणाऱ्या पर्यटकांना पशु, पक्ष्यांचे विविध आवाज काढून दाखिवत असल्याने ताडोबामध्ये त्याला ‘बर्डमॅन’ म्हणून ओळखले जात आहे. सुमेध वाघमारे असे त्यांचे नाव आहे. या ‘बर्डमॅन’मुळे पर्यटकांना पशु व पक्ष्यांचा हुबेहुब पक्षांचा आवाज ऐकायला मिळत आहे.हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प देश-विदेशात जगप्रिसध्द आहे. देश-विदेशातील पर्यटक जंगल सफारी व व्याघ्र सफारीसाठी ताडोबात येत असतात.

ताडोबामध्ये वाघ, बिबट यासह पशु, पक्षीसुध्दा मोठ्या संख्येने आहेत. ताडोबात जवळपासस २०० हून अधिक पशू व पक्ष्यांची नोंद आहे. शहरी भागातील वाढते औद्योगिकरण, सिमेंटची घरे, प्रदुषण यामुळे पक्षी नाहीसे होत आहे. त्यामुळे लृप्त होत असलेल्या पक्ष्यांना बघणे त्यांचा आवाज ऐकणे हा एक सुखद क्षण आहे. ताडोबामध्ये कार्यरत असलेले  सुमेध वाघमारे हे तब्बल २०० पशु, पक्ष्यांचे आवाज काढतात. चिमणी, कावळा, मोर, लांडोर, कोंबळी, कोकीळा, रानम्हैस, रानगवा, हरीण, साबंर यासह २०० हून अधिक पशु व पक्ष्यांचे आवाज काढून पर्यटकांना याबद्दल माहिती देत आहे.

यामाध्यमातून ते पशू, पक्षी वाचविण्याचा संदेश सर्वदूर पोहोचवित आहे. २०० हून अधिक पशू पक्ष्यांचे आवाज काढत असल्याने वाघमारेला ‘बर्डमॅन’ म्हणून ओळखले जात आहे. विशेष म्हणजे वाघमारे यांनी संघर्ष करित हे यश मिळविले आहे. आवाज काढण्याचे उपजत कलागुण असलेल्या वाघमारे यांनी परिस्थितीशी दोन हात करित कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कधी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय केला तर कधी अन्य काम करून पोट भरले.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात गॅट मॅनेजर पदाची परिक्षा देण्यासाठी वाघमारे चंद्रपुरात आले. त्यांच्या उपजत कलागुणांची दखल ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांच्यासह ताडोबा कोरचे उपवनसंरक्षक नंदकुमार काळे, मोहुर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी घेतली. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वीच वाघमारे ताडोबात दाखल झाले आहेत. ताडोबात आता ते वेगवेगळ्या पक्षांचा आवाज काढून पर्यटकांचे मनोरंजन करित आहेत. तसेच त्यांच्या आवाजाचे शो देखील ताडोबात आयोजित केले जात आहे. वाघमारे यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत याच पध्दतीचे काम केले आहे. त्याच आवाजाच्या जादुची किमया आता ताडोबा प्रकल्पात दाखवून पर्यटकांचे मनोरंजन करित आहेत.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प