शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

सभागृह, लॉनधारकांकडे कोट्यवधी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

बहुतांश मुलींचे वडील कर्ज काढूनच विवाह लावून देतात. लॉकडाऊनमूळे लग्नकार्य रद्द करावे लागले. सोशल डिस्टन्सिंग पाळून लग्न लावणाऱ्या कुटुंबांची संख्या बोटावर मोजण्याऐवढी आहे. मुलींच्या वडिलांनी सभागृह मालक लॉन मालकांना अंशत: किवा पूर्ण बुकींची रक्कम दिली. बºयाच कुटुंबांनी विवाह सोहळा पुढे ढकलले. मात्र, बुकींची रक्कम परत मिळाली नाही तर पुढे काय या प्रश्नाने अस्वस्थ झाले आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे अनेक कार्यक्रम रद्द : विवाह सोहळ्यासाठी पालकांनी केले होते बुकिंग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नोव्हेंबर ते जून हा महिना लग्नाचा हंगाम म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील हजारो पालकांनी आपल्या उपवर मुला-मुलींचे विवाह निश्चित केले. यासाठी सभागृह, कॅटरर व लॉन बुकींग केले. मात्र, जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायदा १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू झाल्याने कौटुंंबीक व सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना प्रतिबंध घालण्यात आला. त्यामुळे मुला-मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी आगाऊ रक्कम देऊन बुकींग केलेले कोट्यवधी अडकले आहेत.बहुतांश मुलींचे वडील कर्ज काढूनच विवाह लावून देतात. लॉकडाऊनमूळे लग्नकार्य रद्द करावे लागले. सोशल डिस्टन्सिंग पाळून लग्न लावणाऱ्या कुटुंबांची संख्या बोटावर मोजण्याऐवढी आहे. मुलींच्या वडिलांनी सभागृह मालक लॉन मालकांना अंशत: किवा पूर्ण बुकींची रक्कम दिली. बऱ्याच कुटुंबांनी विवाह सोहळा पुढे ढकलले. मात्र, बुकींची रक्कम परत मिळाली नाही तर पुढे काय या प्रश्नाने अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे कुणाचेही नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन, महानगर पालिका, सर्व नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मध्यस्थाची भूमिका पार पाडणे अत्यावश्यक झाले आहे.काहींनी नकार दिल्याने आयुक्तांकडे निवेदनकोरोनाचे संकट साऱ्या जगावरच आहे. यामध्ये कुणीही दोषी नाही. विवाह सोहळा पुढे ढकलेल्या काही कुटुंबांनी सभागृह व लॉनमालकांनी पैसे परत मागितले असताना नकार दिल्याने चंद्रपूर मनपाचे नगरसेवक सचिन भोयर यांच्या उपस्थितीत पालकांनी मनपा आयुक्तांना दिले.२ हजार ६९९ जणांचे क्वारंटाईन पूर्णब्रह्मपरी : रोजगार, शिक्षण व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने परजिल्ह्यात गेलेले तालुक्यातील ३ हजार ३३७ व्यक्ती परजिल्ह्यातून दाखल झाले होते. त्यापैकी २ हजार ६९९ जणांचा क्वारंटाईन काळ पूर्ण झाला. सध्या ६३८ व्यक्ती अजूनही क्वारंटाईनमध्ये आहेत. ब्रह्मपुरी शहरातील ३४५ व्यक्ती होम क्वारंटाईन पूर्ण झाले तर ११५ होम क्वारंटाईन आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये. तालुक्यातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी निश्चित केलेल्या वेळेतच बाजारात जावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न