चंद्रपूर : येथील महानगर पालिकेच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध चंद्रपूर जिल्हा शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा शनिवारी चौथा दिवस होता. गुढीपाडव्यानिमित्त उपोषण मंडपात गुढी उभारण्यात आली. तसेच यावेळी भजनाचाही कार्यक्रम ठेवण्यात आला. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नाना श्यामकुळे हे महापौर व उपमहापौरांवर अंकूश ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप नागरकर यांनी केला असून परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. याप्रसंगी नगरसचिव सुरेश दुर्शेलवार, उपाध्यक्ष सुलेमान अली, बंडोपंत तातावार, राजा काजी, प्रकाश अधिकारी, शंकर गार्गेलवार, यशवंत खडसे, प्रभाकर चहारे, राजू दास, पवन नागरकर, राहूल हडपे, भारत बडवे, अशोक खोब्रागडे, कमलाकर जाधव, यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
उपोषण मंडपात गुढी उभारून केले भजन
By admin | Updated: March 22, 2015 00:08 IST