शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पर्यटकांना खुणावणारा ‘भिमलकुंड’

By admin | Updated: June 27, 2015 01:29 IST

माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी कोरपना तालुक्यातील ‘सावलहिरा’ गावापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर ...

जयंत जेनेकर कान्हाळगाव (कोरपना) माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी कोरपना तालुक्यातील ‘सावलहिरा’ गावापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर डोंगररांगात १५० फुट उंचीचा ‘भिमलकुंड’ धबधबा आहे. हा धबधबा आता ओसंडून वाहू लागला असून पर्यटनप्रेमी व ट्रेकर्ससाठी आकर्षण ठरत आहे. भिमलकुंड धबधब्याचा उपेक्षित स्थळांमध्ये समावेश असला तरी येथील निसर्गरम्य सफारीची अनुभुती काही वेगळीच आहे.येथे जाण्यासाठी कुठलाही पक्का रस्ता नाही की पायवाट नाही. डोंगररांगातील हिरव्याकंच वनराईतून पायदळ वारी करत स्थळ गाठावे लागते. डोंगरदऱ्यांमुळे येथे एखादा व्यक्ती रस्ता सोडून भटकण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर असलेली हिरवळ व धबधब्याचे सौंदर्य सर्वांनाच मोहीत करते. सभोवताल हिरवे रान त्यामध्ये असलेल्या डोंगरमाथ्यावरून कोसळणारा धबधबा विलोभनीय दिसतो. पक्ष्यांचा किलबिलाट अन् खळाळणारा धबधबा मनाला भूरळ घालतो. येथील रानफुल सुगंधाची मुक्त हस्ताने उधळण करीत असतात. निसर्गाच्या या शावरखाली अंघोळ करण्याची मजा वेगळीच ! त्यामुळे अनेकजण या धबधब्याला भेट देतात. सुमारे १५० फुट उंच कडावरून कोसळणाऱ्या पाण्यांमुळे खाली जमिनीवर कुंड तयार झाला. या कुंडाला ‘भिमलकुंड’ म्हणून संबोधले जाते. या कुंडाचे रूप हे भीमासारखे भासत असल्यानेच याचे नाव ‘भिमलकुंड’ पडले असावे. मात्र येथील कडा उतरणे व चढणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळेच या धबधब्याचा पर्यटनाचा दृष्टीने विकास होणे आवश्यक आहे. येथे जाण्यासाठी मुख्य अडचण रस्त्याची असल्याने महिला, लहान मुले व वयोवृद्धांना याठिकाणी सहज येता येत नाही. या डोंगरावर विविध वनऔषधी वनस्पती असल्याचे दिसून येते. येथील रस्त्याच्या कडेला आवळ्याच्या रांगा आहे. या धबधब्यालगतच्या परिसरात भस्म नागाची खोरी, रोहिणीमुंडा, जांभूळधराची झिरणे, बोदबोधी आदी पर्यटनस्थळेही आहेत.येथे कसे पोहचाल?भिमलकुंड धबधबा येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहे. एक मार्ग सावलहिरा आणि दुसरा टांगाळा. यातील सावलहिरावरून जाताना येल्लापूर रस्त्यावर पहाडी आहे. तिथून गोल घुमटांच्या दिशेने रस्त्यावरच दुचाकी ठेऊन पायदळ वारी करीत डोंगरमाथातून स्थळापर्यंत पोहचता येते. टांगाळा येथून नाल्या-नाल्याने सरळ दिशेने वर चढत जावे लागते. दोन्ही मार्गाने वाहनांने जाता येत नाही. ही वाहने लाल पहाडी किंवा टांगाळा येथेच ठेऊन पायदळ मार्गक्रमण करावे लागते.पर्यटनदृष्ट्या व्हावा विकासमाणिकगड पहाडालगत वसलेल्या कोरपना व जिवती तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे आहे. मात्र ती उपेक्षित असून शासन दरबारी साधी नोंदसुद्धा नाही. या स्थळांवर लक्ष केंद्रीत करून विकास आराखडा तयार करावा. तालुक्यातील पकडीगुड्म, अमलनाला धरण, चौपाटी गुफा, काराई गोराई, कपिलाई भुयार, बानकदेवी आदी स्थळांचा पर्यटन विकास करावा.