आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भीमा कोरेगाव येथे शहीद झालेल्या शुरांना अभिवादन करण्यासाठी समता सैनिक दलातर्फे भीमा कोरेगाव शौय रथ तयार करण्यात आला आहे. हा शौर्य रथ जिल्ह्यातील २०० गावांना भेट देणार असून सोमवारी दुपारी २ वाजता भीमा कोरेगाव शौर्य रथाला डॉ. विनोद नगराळे, आर्किटेक्चर राजेश रंगारी यांनी निळी झेंडी दाखवली. त्यानंतर सदर रथ नांदगाव (पोडे) कडे रवाना झाले.दरम्यान समता सैनिक दलातर्फे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय बौद्ध महासभेने तयार केलेल्या भीमा कोरेगावच्या विजयीस्तंभाच्या प्रतिकृतीला मालार्पण करुन शहिदांना अभिवादन करण्यात आले.भीमा कोरेगाव येथे ५०० महारांनी २८ हजार पेशव्यांच्या विरोधात लढा देऊन विजय प्राप्त केला. या घटनेच्या स्मरणार्थ भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभांचे निर्माण करण्यात आले. या र्शोौ दिनाला यावर्षी २०० वर्ष पूर्ण झाल्याने समता सैनिक दलाच्या वतीने शहिदांना अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव शौर्य रथ तयार करण्यात आले आहे. तसेच आपल्या शुरविराचा इतिहास सर्वांना माहिती व्हावा, या उद्देशाने सदर रथ ७ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील २०० गावात फिरविण्यात येणार आहे. तसेच याचा समापन कार्यक्रम ८ एप्रिलला चोखामेळा मुलांचे वसतिगृह चोरखिडकी येथे करण्यात येणार आहे. अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते खुशाल तेलंग, डॉ. भाऊ राजदीप, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष इंजि.तथागत पेटकर, अश्विन खोब्रागडे, समता सैनिक दलाचे डॉ. प्रजेश घडसे, प्रणित भगत, मिलिंद तेलंग, प्राविण्य पाथर्डे, सोहन पाटील, रवींद्र उमाटे, सुदेश कांबळे, नागसेन खंडाळे, मयूर साठे आदी उपस्थित होते.
भीमा कोरेगाव शौर्य रथ २०० गावांना भेटी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:18 IST
भीमा कोरेगाव येथे शहीद झालेल्या शुरांना अभिवादन करण्यासाठी समता सैनिक दलातर्फे भीमा कोरेगाव शौय रथ तयार करण्यात आला आहे.
भीमा कोरेगाव शौर्य रथ २०० गावांना भेटी देणार
ठळक मुद्देसमता सैनिक दलाचा उपक्रम : चंद्रपुरात शहिदांना अभिवादन