शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

भारिप बहुजन महासंघाचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:42 IST

भारिप बहुजन महासंघ, जिल्हा कृती समिती व महाराष्ट्र राज्य आरक्षण बचाव मध्यवर्ती कृती समितीच्या वतीने बुधवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. व्ही. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भारिप बहुजन महासंघ, जिल्हा कृती समिती व महाराष्ट्र राज्य आरक्षण बचाव मध्यवर्ती कृती समितीच्या वतीने बुधवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. व्ही. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.संत गाडगे महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर खुशाल तेलंग, प्रा. एस. टी. चिकटे, बंडू नगराळे, अंकुश वाघमारे, एस. डी. सातकर, जि. के. उपरे, हिराचंद बोरकुटे, नामदेव कन्नाके आदींनी मार्गदर्शन केले.मागील दोन वर्षांपासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकीत आहे. ती शिष्यवृत्ती त्वरीत देण्यात यावी, पदोन्नतीतील आरक्षण पूर्ववत सुरु ठेवण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयाने मागितलेली माहिती तात्काळ सादर करावी, अनुसूचित जाती-जमातीचा निधी इतरत्र वळता केला जाणार नाही, यासाठी तेलंगाणा, आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे कायदा करावा, आदी मागण्यांचे निवेदन भारत थुलकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. सदर निवेदनाची दखल घेऊन मागण्या त्वरीत सोडविण्यात याव्या, अन्यथा भारिप बहुजन महासंघ व आरक्षण बचाव मध्यवर्ती कृती समितीतर्फे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात एस. डी. सातकर, सेवचंद नागदेवते, सत्यभामा भाले, जास्वंदी माऊलीकर, रमेश वर्धे, राजेराम पुल्लोरी, बंडू नगराळे तसेच भारिपचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक सुरेश नारनवरे, संचालन प्रदिप झाडे व आभार संतोष डांगे यांनी मानले.