पाण्यासाठी भटकंती : वर्धा नदीचे पात्र पडले कोरडेभद्रावती : अर्ध्या भद्रावती शहराला वर्धा नदीतून पाणी पुरवठा केला जाते. मात्र वर्धा नदीची धार आटल्याने अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहराला पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांची ओरड वाढली आहे. पालिकेने ट्युबवेलमधून पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.मान्सून धडकणार केव्हा याची प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने आता शेवटच्या क्षणावर तेलवासा येथील वर्धा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. येथील तेलवासा घाटावरुन भद्रावती शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र पात्र कोरडे पडल्याने गेल्या काही दिवसांपासून न.प. प्रशासनाच्या पााण्याच्या टाकीत पाणी साचत नसल्याने नळाला पाणी येत नाही. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील अर्धा पाणी पुरवठा येथील ट्युबवेलवर अवलंबून असल्याने या कनेक्शनधारकांना मुबलक पाणी मिळत आहे. मात्र जे नळ कनेक्शनधारक वर्धा नदीच्या पाणी टाकीवर अवलंबून आहेत, त्यांना मात्र पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर नगरपरिषदसुद्धा टँकरद्वारे पाणी देण्याची सोय करीत नसल्याने नागरिकांची ओरड वाढली आहे. पाणी समस्या लक्षात घेता, नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष घालून नियमित पाणी पुरवठा करावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)वर्धा नदी पात्रात काही दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्या पाण्यावर काही दिवस पाणी पुरवठा करण्यात आला. अद्याप नैसर्गिक पाऊस पडलेला नाही व नदी पात्रातसुद्धा पाणी नाही. त्यामुळे शहरात पाणी टंचाई भासत आहे. मात्र एक-दोन दिवसात ट्युबवेलमधून पाणी पुरवठा उपलब्ध करून पाणी पुरवठा नियमीत सुरू केला जाईल.- स्वप्नील पिदूरकरपाणी पुरवठा अभियंता,न.प. भद्रावती
भद्रावतीचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 00:42 IST