शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

भद्रावती पं.स.कार्यालय रामभरोसे

By admin | Updated: October 15, 2016 00:51 IST

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून सुरू केले.

विनायक येसेकर भद्रावतीएकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून सुरू केले. तसेच नशामुक्तीसाठी राज्यात गुटखा बंदी आणि या जिल्ह्यात दारुबंदी राबवून एक सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचा जनप्रतिनिधींनी वसा घेतला आहे. मात्र शासनाच्या या योजनेला शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांद्वारे हरताळ फासण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजता लोकमतने केलेल्या स्ट्रिंग आॅपरेशनवरुन दिसून आले.भद्रावती पंचायत समितीचे वेगवेगळे विभाग एक छत्रछायेखाली नाहीत. त्यामुळे याठिकाणी कार्यालयीन कामासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना संबंधित विभाग शोधणे कठीण जाते. त्यात कुणी एखादा विभाग कुठे आहे? अशी विचारणा केल्यास त्याला बरोबर उत्तर मिळत नाही. तसेच संबंधित विभागाचे प्रमुख हे मनमानी कारभार करीत असल्याचे लोकमत स्टिंग आॅपरेशन मधून समोर आले. कर्मचाऱ्यांवर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजरच नाही. काही अधिकारी आणि कर्मचारी चक्क या कार्यालयीन वेळा चहाच्या टपरीवर गप्पा मारताना दिसले. पंचायत समिती सभापती, उपसभापती, संवर्ग विकास अधिकारी कार्यालत उपस्थित नव्हते. पंचायत समितीच्या परिसरात अस्वच्छतेचा कळस होता. पिण्याच्या पाण्याच्या जागी पान खर्ऱ्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या आहेत. कनिष्ठ कर्मचारी आपल्यासाठी आणि साहेबांसाठी कार्यालयात बिनधास्त तंबाखू घोटत असल्याचे आढळले. यावर त्याला विचारणा केली असता तुमी आमचे साहेब होत का? विचाराले असा खोचक प्रश्न त्याने केला. त्यातच आजूबाजूला वाढलेला कचऱ्यामुळे हा संपूर्ण परिसर अस्वच्छ दिसतो.सभापती निवास की, दारुचा अड्डापंचायत समितीला लागूनच सभापती निवास आहे. या निवासात सभापती गेल्या अडीच वर्षांपासून राहतच नाही. येथे कृषी विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले. कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर इतर विभागातील काही अधिकारी, कर्मचारी आणि बाहेरील व्यक्ती या ठिकाणी बसून ओली पार्टी झोडीत असतात. सभापती निवासात असलेल्या एका टाक्यात दारुच्या खाली बाटल्यांनी खचाखच भरलेल्या ढिगावरुन दिसून आले. तसेच या टाक्यात मिनरल वॉटर बॉटल, पाणी पाऊचचे रिकामे पॉकेट खचाखच भरुन आहेत. तसेच कार्यालयाच्या मागील भागातसुद्धा रिकाम्या दारुच्या बाटल्या आढळल्या. चंद्रपूर जिल्हा दारुबंदी असताना आणि १०० टक्के दारुबंदीसाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रयत्न करीत असताना, हा प्रकार शासकीय प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घडत असेल. तर दारुबंदी किती यशस्वी झाली, हे ‘लोकमत’च्या स्ट्रिंग आॅपरेशनवरुन दिसून येते. याबाबत आमच्या वार्ताहरांने आपल्या भ्रमणध्वनीवरुन संवर्ग विकास अधिकारी तुपे यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी संपर्क साधण्याचे टाळले.कारवाईची मागणी अन्यथा आंदोलनआपण पंचायत समितीच्या या भोंगळ कारभाराबाबत वेळोवेळी वरिष्ठांना माहिती दिली. परंतु त्यात त्यांनी कुठल्याच प्रकारची सुधारणा केली नाही. यावरुन त्यांचेसुद्धा या कामात सहकार्य असावे अशी शंका येते. लोकमतने केलेल्या या स्ट्रिंग आॅपरेशनने आता तरी ही बाब समाजासमोर आली आहे. लोकमतचे हे कार्य स्तुत्य आहे. तरीही बदल झाला नाही तर आंदोलन उभारु, असा इशारा भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. राजू गेनवार यांनी दिला.जि.प. सदस्य विजय वानखेडेपंचायत समिती कार्यालयात सुरू असलेल्या हा प्रकार निंदनीय आहे. जिल्हा दारूबंदी असताना सभापती निवासातील कृषी विभागात तसेच परिसरात आढळलेल्या दारूच्या रिकाम्या बाटला हे त्याठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या निढविलेल्या वृत्तीचे घ्रोतक आहे. यात बदल व्हावा याकरीत आपण मुख्यकार्यकारी अधिकारी यांना भेटू असे विजय वानखेडे यांनी सांगितले.