शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनी प्रदूषण कराल तर खबरदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:17 IST

आगामी गणेशोत्सव मंगलमय व ध्वनी प्रदूषण मुक्त साजरा होईल, यावर सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी भर दिला पाहीजे.

ठळक मुद्देगणेश मंडळांच्या पदाधिकाºयांची बैठक : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आगामी गणेशोत्सव मंगलमय व ध्वनी प्रदूषण मुक्त साजरा होईल, यावर सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी भर दिला पाहीजे. ध्वनीप्रदूषणच्या बाबतीत उच्च न्यायालयाने सुद्धा निरीक्षक नेमलेले असून ध्वनी प्रदूषणाच्या कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आहेत. या कायद्यानुसार जो कोणी ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करेल, त्याला पाच वर्ष शिक्षा किंवा तीन लाख रुपये दंडाची शिक्षा होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिली.आगामी गणेशोत्सवाच्या निमित्त्याने चंद्रपूर पोलीस मुख्यालयात जिल्हा शांतता समिती तसेच जिल्ह्यातील गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांची संयुक्त बैठक ड्रिल शेड पोलीस मुख्यालय येथे पार पडली. या बैठकीत ते बोलत होते.बैठकीला महापौर अंजली घोटेकर, पोलीस अधीक्षक नियती ठाकर, मनपा आयुक्त संजय काकडे, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, धर्मदाय उपआयुक्त तसेच जिल्हा शांतता समितीचे सदस्य, जिल्ह्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.गणेश सभामंडपाच्या रोषणाईकरिता लावण्यात आलेल्या इलेक्ट्रीक वायरची जुळणी ही अतीशय थातूरमातूर स्वरूपात केलेली असते. इलेक्ट्रीक वायरची जुळणी अपघात होऊ नये, या दृष्टीणे योग्यप्रकारे करुन घ्यावी तसेच आयएसआय मार्क असलेले विद्युत उपकरणे वापरण्यास व शहरातील सिव्हील इलेक्ट्रीकल लाईनला स्पर्श होणार नाही, यादृष्टीने १५ फूटापेक्षा जास्त उंचीची गणेशमूर्ती किंवा मूर्ती विसर्जनाची सजावट नसावी, याबाबतही सर्व गणेश मंडळांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.सर्व गणेश मंडळांना उत्सवा दरम्यान मंगलमय भक्तीपर गीते लावण्याचे, तसेच पीओपी मूर्ती न वापरता इको फ्रेन्डली मूर्ती वापरुन जलचर प्राण्याचे रक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले. विसर्जन मार्गावर एकूण ३५ रुग्णालय आहेत. त्यामध्ये आपलेच कोणीतरी बांधव उपचार घेत असल्याची जाणीव ठेवून गणेश मिरवणूकीचा त्रास रुग्णांना होणार नाही, याची दक्षता प्रत्येक गणेश मंडळांनी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक ठाकर यांनी यावेळी केले. या बैठकीला जिल्हाभरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंडळाची नोंदणी व खर्चाचा ताळमेळ सादर करणे आवश्यकबैठकीत माहिती देताना धर्मदाय आयुक्त यांनी सर्व गणेश मंडळाची नोंदणी असणे आवश्यक असून पदाधिकाºयांच्या सोयीसाठी शासनाने संकेत स्थळाची निर्मिती केली आहे. त्यावर जाऊन मंडळानी गणपती मंडळाची नोंदणी करणे आवश्यक असून या वर्षी नोंदणी करतेवेळेस मंडळातील सदस्यांचे पॅन कार्ड नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व मंडळाची धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून तपासणी केली जाणार असून मंडळाच्या दस्तऐवजाची सुद्धा तपासणी केली जाणार आहे. यामध्ये जे कोणतेही मंडळ परवानगी न घेतल्याचे आढळून आल्यास तसेच दस्ताऐवजामध्ये कुठलाही गैरप्रकार आढळून आल्यास त्या मंडळावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. उत्सवा दरम्यान मंडळाची वर्गणी व करण्यात आलेला खर्च याबाबत अकाऊंट स्टेटमेन्ट अद्यावत असणे आवश्यक असून ते धर्मदाय आयुक्त येथे जमा करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.वर्गणी मागताना जबरदस्ती नकोवर्गणी गोळा करताना कोणावरही जबरदस्ती व्हायला नको, याची काळजी प्रत्येक मंडळाने घ्यावी. वर्गणीबाबत कोणत्याही प्रकारे तक्रार प्राप्त झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. त्याचप्रमाणे विसर्जनामध्ये एका मंडळाकडे तीन पेक्षा जास्त वाहनाची परवाणगी देण्यात येणार नाही. नियमांमध्ये व कायद्याच्या अमंलबजावणीमध्ये कोणताही भेदभाव मंडळाची प्रतिष्ठा पाहून केल्या जाणार नाही. प्रत्येक लहान मोठ्या गणेश मंडळानी कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे व सामाजिक स्वास्थ्याचे उल्लंघन होणार नाही, याची विशेष खबरदारी घ्यावी, असे पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी बैठकीत सांगितले.