शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

सावधान ! चंद्रपुरात दीड लाखांचे बनावट पनीर जप्त ! पनीरची गुणवत्ता कशी ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 14:05 IST

प्रशासनाची धाड : पनीरच्या नावाखाली चीज अॅनालॉग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वांनाच आवडणाऱ्या पनीरच्या नावाखाली चक्क चीज अॅनालॉग नावाच्या घातक पदार्थाची चंद्रपुरात विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव शुक्रवारी (दि. ७) धाडसत्रातून पुढे आले. अन्न व औषध प्रशासनाने दोन वेगवेगळ्या कारवाईत तब्बल १ लाख ५० हजार २०० रुपयांचा (४७२ किलो ग्रॅम) पनीर साठा जप्त केला आहे.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी जी. टी. सातकर यांनी बुधवारी (दि. ५) चंद्रपूर येथील सपना डेली निड्सची तपासणी केली. त्यावेळी या दुकानात चीज अॅनालॉग हा अन्नपदार्थ पनीर म्हणून विक्री करीत असल्याचे समोर आले. पथकाने दुकानातून ५१ हजार २०० रुपये किमतीचा १९७ किलो ग्रॅम साठा जप्त केला. गोलबाजार परिसरातील तिलक मैदानात न्यू भाग्यश्री घी भंडारातून ९९ हजार रुपये किमतीचा पनीर म्हणून विक्री केला जाणारा २७५ कि.ग्रॅ. चीज अॅनालॉग हा घातक पदार्थ जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईने चंद्रपुरातील विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने दुग्धजन्य पदार्थ व पनीर आदी पदार्थाचा डिमांड वाढला. त्यामुळे काही विक्रेते भेसळ करून विक्री करण्याची शक्यता आहे. 

ग्राहकांनो, जागरूक व्हासध्या लग्नसराईला सुरुवात झाल्याने पनीरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नफा मिळविण्यासाठी विक्रेते आरोग्याला हानीकारक असलेल्या चीज अॅनालॉगची विक्री करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी कोणतेही अन्नपदार्थ खरेदी करताना जागरूक राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले. 

४७२ किलो ग्रॅम बनावट पनीर जप्तचंद्रपुरात दोन दुकानात बनावट पनीर आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने आता सर्वच दुकानांची तपासणी 

ग्राहकांनो, जागरूक व्हासध्या लग्नसराईला सुरुवात झाल्याने पनीरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नफा मिळविण्यासाठी विक्रेते आरोग्याला हानीकारक असलेल्या चीज अॅनालॉगची विक्री करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी कोणतेही अन्नपदार्थ खरेदी करताना जागरूक राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले.

जप्त नमुने प्रयोगशाळेतदोन्ही कारवाईत अन्न व औषध प्रशासनाचे जप्त केलेला ४७२ कि. ग्रॅ. पनीरमध्ये चीज अॅनालॉगचे नमुने आढळून आले. या नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. अन्नपदार्थांचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालाच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६, नियम व नियमन २०११ नुसार संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.

"व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६, नियम व नियमन २०११ च्या अंतर्गत नियमांचे पालन करूनच अन्न व्यवसाय करावा. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कारवाई करू. अन्नपदार्थांमध्ये भेसळ किंवा इतर कुठलीही तक्रार असल्यास सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयात माहिती द्यावी."- प्रवीण उमप, सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfoodअन्न